पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग.

0

पुणे :

कोरोना संसर्गावर लस तयार करणार्‍या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग लागल्याची घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास घडली. मांजरीच्या बाजूकडे असलेल्या मागील गेटच्या बाजूला नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे.

सिरम इन्स्टिट्यूमधील कर्मचार्‍यांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली त्यानंतर १० अग्निशमन दलाच्या गाड्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली. मात्र आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे समजू शकलेले नाही.

सिरमने दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी आग लागली आहे त्या इमारतीत अन्य लसीची निर्मिती सुरु आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कोरोना लसीचे उत्पादन सुरु आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धोका नाही. त्यामुळ लस निर्मितीवर कोणताही परिणाम होणार नाही. आग लागलेल्या ठिकाणापासून कोविशिल्ड तयार होत असलेली इमारत दूर आहे. आग लागलेल्या इमारतीमधून आतापर्यंत तिघांना वाचवण्यात यश आले आहे. अन्य एकाचा अजून शोध सुरु आहे.

See also  पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये पीएमपीएलने 10 रुपयांमध्ये दिवसभर वातानुकूलित प्रवास