धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा चंद्रकांत पाटील यांची मागणी. 

0

पुणे:

रेणू शर्मा आणि करुणा शर्मा ही दोन प्रकरणं वेगळी आहेत. रेणू शर्मा प्रकरणाची चौकशी सुरूच राहील. पण करुणा शर्माप्रकरणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ही मागणी करताना महाराष्ट्रासह देशभरातील मंत्र्यांना कसा राजीनामा द्यावा लागला होता, याची उदाहरणच चंद्रकांत पाटील यांनी सादर केली.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे प्रकरणात दिशाभूल केली जात असल्याचा दावा केला. दोन वेगवेगळ्या प्रकरणाची गल्लत केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशा प्रकारची प्रकरणे घडल्यानंतर त्यावेळच्या माजी मंत्र्यांनी नैतिकतेच्या कारणास्तव कसा राजीनामा दिला होता, याची उदाहरणच त्यांनी मांडली.

सोमवारपासून आंदोलन

अशा प्रकारच्या चुका झाल्या तर राजीनामा देणं हेच चांगलं असतं. राजकारणात आतापर्यंत असंच झालं आहे, असं सांगतानाच धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास सोमवारपासून तहसिल कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल. महिला मोर्चाकडून ही निदर्शने होतील. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने तहसीलदार आणि कलेक्टरला निवेदन देण्यात येईल, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

See also  महाविकास आघाडी सरकारवरील संताप पंढरपूरमध्ये व्यक्त झाला : चंद्रकांत पाटील