धनंजय मुंडे प्रकरण वेगळे वळण : महिलेची माघार

0

मुंबई :

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने खळबळजनक आरोप केल्यानंतर, प्रकरणात अडचणीत सापडलेल्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना तुर्तास राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून दिलासा मिळाला आहे.

या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी, त्यानंतर बघू अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत घेतली आहे. रात्री उशीरा पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप ब्लॅकमेलिंग असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर खुलासाही धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून केला आहे.

या संपूर्ण घटनेत भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने संपूर्ण घडामोडीला उलट कलाटणी मिळाली, कृष्णा हेगडे यांनी तक्रारदार मुलीवर गंभीर आरोप करत २०१० पासून ही महिला सतत माझ्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप केल्यानं धनंजय मुंडे यांच्याविरोधात असलेले वातावरण त्यांच्या बाजूने वळलं.

त्यानंतर आता या तक्रारदार महिलेने माघार घेत असल्याच्या पावित्र्यात ट्विटमध्ये म्हटलं की, एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी निर्णय घ्या, काहीही माहिती नसताना जे मला ओळखत नाहीत आणि जे ओळखतात ते चुकीचा आरोप करत आहेत. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा, मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे.

त्याच बरोबर त्यांनी मी चुकीची होती तर हे लोक आतापर्यंत पुढे का आले नाहीत? मी मागे हटली तरी मला माझ्यावर गर्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटीच अशी मुलगी आहे जी लढतेय. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही आणि हे लोक माझ्याविरोधात एकत्र आलेत, तुम्हाला जे हवं ते लिहा असं सांगत रेणु शर्माने देव तुमचं भलं करो असं ट्विटमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे आधी धनंजय मुंडे वर आरोप, मुंढेंच्या राजीनाम्याची चर्चा, कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी यांची एन्ट्री आणि आता महिलेची माघार त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

See also  कोरोना संकटाचे भान राखून नवीन वर्षाचं स्वागत करावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे