भाजपा पुणे शहर अध्यक्षपदी धीरज घाटे…

0

पुणे:

आगामी निवडणुकींच्या अनुषंगाने भाजपने पुणे शहर अध्यक्षपदावरून जगदीश मुळीक यांना दूर करून धीरज रामचंद्र घाटे यांची नियुक्ती केली आहे . त्यांची हि नियुक्ती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी जाहीर केली आहे.

कसबा पोटनिवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतरच पुणे शहराध्यक्ष बदलाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. धीरज घाटे यांच्यासह दीपक पोटे, माधुरी मिसाळ, राजेश येनपुरे यांची नावं शहराध्यक्ष पदाच्या चर्चेत होती अखेर घाटे यांच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ पडली आहे.

धीरज घाटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून स्वयंसेवक राहिले असून काही काळ त्यांनी पूर्णवेळ प्रचारक म्हणून देखील काम केलं आहे. पुणे महानगर पालिकेत नगरसेवक, सभागृहनेता म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं आहे.

See also  राज्य सरकारनेच ओबीसींचे आरक्षण पुन्हा मिळविण्याची जबाबदारी पार पाडणे आवश्यक : चंद्रकांत पाटील