पुणे जिल्ह्यातून कबड्डीचे तीन संघ राज्य स्तरावर खेळण्यासाठी जातील : अजित पवार

0

पुणे :

नेहरु स्टेडीयम येथील पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्राच्या राज्याच्या पुरुष व महिला कबड्डी संघाने राष्ट्रीय पातळीवर व पुणे जिल्ह्याच्या महिला कबड्डी संघाने राज्य पातळीवर केलेल्या गौरवशाली कामगिरी बद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिक विजेत्या खेळाडूंचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केले.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले, कबड्डी मध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. त्यानुसार राज्य स्तरावर खेळाच्या हिताच्या दृष्टीने काही बदल झालेले आहेत. तर काही चांगले बदल भविष्यात घेतले जातील. खेळात बोगस प्रमाण पत्र घेऊन ज्यांचा पायाला माती लागली नाही अशा लोकांनी नोकऱ्या मिळविल्या त्यामुळे काही कठोर निर्णय घ्यावे लागले आहेत ते घेतले. आता खेळाडूंना शासकीय नोकरीत त्याचा मोठा फायदा होईल. पुणे जिल्हा क्षेत्रपळाच्या दृष्टीने मोठा असल्याने व खेळाडूंची संख्याही जास्त असल्याने राज्यातील अ व ब दर्जाच्या महानगरपालिका क्षेत्रातील खेळाडूंना सहभागी होता यावे यासाठी तीन संघ पाठविण्याचा निर्णय घेतला असून पुणे जिल्ह्यातून तीन संघ राज्य स्तरावर खेळण्यासाठी जातील. देशी खेळ वाढीच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. यासाठी आमदार निधीतून ग्रामीण भागातील खेळाडूंना मॅट उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांकडून मदत होईल मात्र यासाठी पालकमंत्र्याशी चर्चा झालेली आहे, मात्र पाठपुरावा करणे आवश्यक आहे. पालिकेने खेळाडूंना इनडोअर सरावासाठी येथील जागा उपलब्ध करून द्यावी अशी सुचनाही पालिकेला केली आहे.

या वेळी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, उपाध्यक्ष शकुंतला खटावकर, कोषाध्यक्ष मंगल पांडे, नितीन बर्डे, मदन पाटील, मोहन गायकवाड, नवनाथ लोखंडे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अतुल बेनके, उपाध्यक्ष संजोग वाघेरे, महादेव कोंढरे, संगीता कोकाटे, कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, सरकार्यवाह दत्तात्रय झिंजुर्डे, कविता आल्हाट, कोषाध्यक्ष प्रकाश पवार, मधुकर नलावडे, वासंती बोर्डे, उपकार्याध्यक्ष राजेंद्र काळोखे, उपाकोषाध्यक्ष प्रकाश बालवडकर, किरण चांदेरे, राजेश ढमढेरे, हनुमंत पवार, दत्तात्रय माने, प्रवीण नेवाळे, शोभा भगत व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

See also  पाकिस्तानविरुद्ध थरारक सामन्यात झिम्बावेच्या संघानं मिळविला अवघ्या एका धावेनं विजय..

यावेळी हरियाणा येथे झालेल्या ६९ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पदक विजेत्या महाराष्ट्राच्या पुरुष खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. अहमदाबाद येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय खेल स्पर्धेत (नॅशनल गेम्स) महाराष्ट्रातील विजेत्या पुरुष व महिला खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. अहमदनगर येथे झालेल्या ७० व्या राज्य अजिंक्य पद कबड्डी स्पर्धेतील पुणे जिल्हा कबड्डी असोसिएसनच्या विजयी महिला खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. जळगाव येथे झालेल्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेतील पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विजयी महिला खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.