गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात महामानव भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी..

0

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात महामानव भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी केली गेली. कार्यक्रामाची सुरवात प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी प्रतिमा पुजन करुन झाली. कार्यक्रमात बुध्दवंदना डाॅ. रवींद्र क्षीरसागर व डाॅ. महेंद्र वाघमारे व सौरभ साळवे यांनी केली.

प्राचार्य डाॅ. संजय खरात प्रास्ताविक करताना म्हणाले बाबासाहेबांचा प्रतिकूल परिस्थितीत मानव ते महामानव हा झालेला प्रवास थक्क करणारा आहे. डाॅ. बाबासाहेब अंबेडकरांनी राष्ट्र म्हणून असणारी संकल्पना घटनेमध्ये बांधली किंबहुना मांडली. डाॅ. आंबेडकरांचे योगदान या देशाच्या विकासामध्ये अतुलनीय आहे.

प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलताना उपप्राचार्य डाॅ ज्योती गगनग्रास यांनी डाॅ आंबेडकर यांचे विचार मांडले. भारतरत्न डाॅ बाबासाहेब यांचा प्रत्येक क्षेत्राचा गाढा आभ्यास होता. त्यांचे अनेक भाषेवर प्रभुत्व होते. शिक्षणामुळे मानवाची सर्वांगीण प्रगती होते. शिक्षणामुळे हक्क व कर्तव्य यांची जाणिव होते. सामाजिक प्रगती ही स्त्रीयांच्या प्रगती वरुन मोजली जावी. धर्मनिरपेक्षता व लोकशाही याचा खरा अर्थ आंबेडकर यांच्या विचारात आहे. दारिद्रयाची लाज वाटण्यापेक्षा स्वतःच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे म्हणून बुद्धिमत्तेचा विकास हे मानवाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. सामाजिक परिवर्तनाचे कृतिशील माध्यम हे त्यांनी कार्यातून परिवर्तित केले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांची ओळख उपप्राचार्य डाॅ. शुभांगी जोशी यांनी करुन दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅ. संगिता ढमढेरे राव यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
सहकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर व उपकार्यवाह डाॅ. प्रकाश दिक्षित यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.

 

See also  शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करू- अविनाश कांबळे