महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नीतू घंघास, स्वीटी बुराने पटकावले सुवर्णपदक

0

नवी दिल्ली :

दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या IBA जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. नीतू घंघासने ४८ किलो वजनी गटात मंगोलियाच्या लुत्सेखान अल्टेंगसेंगचा पराभव केला. तर स्वीटी बूरा हिने ८१ किलो वजनी गटात चीनच्या वांग लीना हिला हरवून सुवर्णपदक जिंकले.

नीतू घंघासने ४८ किलो वजनी गटात मंगोलियाच्या लुत्सेखान अल्टेंगसेंगचा पराभव केला. हा सामना ५-० असा जिंकून भारतीय बॉक्सर नीतू घंघासने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. तत्पूर्वी, शनिवारी नीतू घंघासने उपांत्य फेरीच्या सामन्यात कझाकिस्तानच्या बॉक्सरचा पराभव केला. त्याचवेळी स्वीटी बूराने भारताला दिवसातील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.

स्वीटीने ८१ किलो वजनी गटात अंतिम सामना ४-३ अशा फरकाने जिंकला. स्वीटीने पहिल्या फेरीपासूनच चिनी बॉक्सरवर वर्चस्व राखले. तिने पहिल्या फेरीतच चिनी बॉक्सरच्या चेहऱ्यावर जोरदार पंचेस लगावले आणि पहिली फेरी ३-२ अशी जिंकली.

 

See also  राजस्थान रॉयल्स ने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा ७ विकेट्स राखून पराभव करून केला अंतिम फेरीत प्रवेश...