ओशो आश्रम व्यवस्थापन आणि अनुयायी यांच्यात वाद, पोलिसांनी केला लाठीचार्ज..

0

पुणे :

गेल्या अनेक दिवसांपासून ओशो आश्रम प्रशासन आणि अनुयायांमध्ये वाद सुरू आहे. आज मात्र हे आंदोलन चिघळलं असून अनुयायांनी धक्काबुक्की करत आश्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज बघायला मिळालाय. ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असून वातावरण चांगलेच चिघळले आहे. सकाळपासूनच ओशो तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळी ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला धुडकावून लावत ओशो अनुयायांनी आश्रमात प्रवेश केला होता. संन्याशी माळा घालून ओशो अनुयायांनी प्रवेश केला मात्र काही वेळेपुरताच हा प्रवेश राहिला. त्यानंतर मात्र मोठा राडा आश्रमाच्या बाहेर पाहायला मिळाला.

पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे दाखल झाला होता. त्यानंतर सौम्य लाठीचार्ज करत ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. त्यामध्ये संन्याशी माळा घालून आश्रमात प्रवेश करण्याची परवानगी नसल्याने हा वाद निर्माण झाला होता. यामध्ये जवळपास दोनशे अनुयायी यावेळेला आंदोलन करीत आहे.

पुण्यातील ओशो आश्रमात संन्याशी माळा घालून प्रवेश शुल्क न भरता प्रवेश करण्याचा आग्रह ओशो अनुयायांनी केला होता. त्याला विरोध ओशो व्यवस्थापकाने केला आहे. हाच विरोध झुगारून अनुयायी आक्रमक झाले होते. आपल्या मागणीवर अनुयायी ठाम असल्याने हा वाद चिघळला आहे.

See also  मराठा आरक्षण अध्यादेशाची होळी : मराठा क्रांती मोर्चा आंदोलक आक्रमक