सुतारवाडी येथील श्री क्षेत्र महादेव मंदिरामध्ये भगवान महादेव शिवलिंग ग्रामदैवत श्री भैरवनाथ व जोगेश्वरी श्री शनि महाराज यांची नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न..

0

सुतारवाडी :

सुतारवाडी येथील श्री क्षेत्र महादेव मंदिरामध्ये भगवान महादेव शिवलिंग ग्रामदैवत श्री भैरवनाथ व जोगेश्वरी श्री शनि महाराज यांची नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्या मध्ये विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. हा सोहळ्यात शनिवार दिनांक ११/३/२०२३ ते मंगळवार दिनांक १४/३/२०२३ पर्यंत सुरू होता. भाविकांनी व परिसरातील नागरिकांनी महिलांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभाग घेतला.

भगवान महादेव शिवलिंग, ग्रामदैवत श्री भैरवनाथ व जोगेश्वरी श्री शनि महाराज यांची नूतन मूर्ती ची टाळ मृदुंगाच्या निनादांमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांचा आवाज गुलालाची उधळण करत धार्मिक विधीं पुर्ण करुन नूतन मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. भाविकांनी नाचत देवाच्या उत्साहामध्ये तल्लीन होऊन हा सोहळा संपन्न केला.

सर्व सुतारवाडी ग्रामस्थांना एकत्र घेऊन हा उत्सव पार पाडला. संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणामध्ये न्हाहून निघाला. कार्यक्रमाचा शेवट हभप महादेव महाराज राऊत यांच्या सुश्राव्य कीर्तनाने झाला.

या वेळी सुतारवाडी गावातील ग्रामस्थ, भजनी मंडळे, सार्वजनिक मंडळे, महिला यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.

See also  लॉकडाऊन नंतर बाणेर मधील ज्ञानेश्वर मुरकुटे हायस्कूल उत्साहात सुरू