3 आय  म्हणजे आदर्शवादी, नाविन्यपूर्ण आणि अविश्वसनीय- ईंटरॅक्शन – माॅडर्न गणेशखिंड

0

गणेशखिंड :

गणेशखिंड येथिल मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्सच्या  संगणक विज्ञान विभागाच्यावतीने 3 दिवसीय आंतरमहाविद्यालयीन कार्यक्रम “इंटरएक्शन” 16, 17 आणि 18 मार्च या कालावधीत घेण्यात येत आहे. या उपक्रमाचे हे 20 वे वर्ष आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यामधे परिपूर्ण बनवण्यासाठी ईंटरॅक्शन -मध्ये 7 वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. 1 मिनिट. डिम, बाइंड कोडिंग, ट्रेझर हंट इ. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऍक्सेंचरचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी ते म्हणाले “कॉलेजचे वातावरण खुप उत्साहवर्धक आहे.  हे मला  महाविद्यालयीन दिवसांची आठवण करून देते. महाविद्यालय शैक्षणिक  तसेच इतर अ‍ॅक्टिव्हिटीजवर लक्ष केंद्रित करत आहे. असे कार्यक्रम मिळालेले न्यान व्यवहारात आणायला शिकवतात.भारत आयटी हा जागतिक स्तरावर प्रतिष्ठित उद्योग आहे. अनेक नवनवीन शोध भारतातील आहेत. आमच्याकडे सर्वात जास्त कर्मचारी आहेत जे या क्षेत्राला जगभरात महत्त्व देतात. आज आम्ही सर्वात जास्त आँनलाईन पेमेंट अँप वापरतो.

प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी महाविद्यालयाची माहिती दिली. डाॅ शुभांगी भातांब्रेकर यांनी विभागाची विविध वैशिष्ट्ये सांगितली. समन्वयक  प्रा. ऐश्वर्या नाईक आणि प्रा. चैताली मकाशीर यांनी स्पर्धेबद्दल कल्पना दिली आणि 3 आय म्हणजे आदर्शवादी, नाविन्यपूर्ण आणि विश्वासदेय आहे. हा कार्यक्रम आंतरमहाविद्यालयीन आहे. यात ट्रेझर हंट स्पर्धेसाठी 64 संघांनी नोंदणी केली असून 260 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून विद्यार्थ्यांसाठी यासाठी व्ही एच एस कंपनीने रोख पारितोषिक दिले आहे व नोकरीच्या संधी देणार आहेत.

प्रा.चैताली मकाशिर कोरान्ने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आभार मानले. सुत्रसंचलन विद्यार्थिनी  तेश सुपेकर  हिने  केले आहे. उपप्राचार्य प्रा स्वाती कंधारकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते. विविध 15 महाविद्यालयातील 1205 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली.

See also  डॉ. सागर बालवडकर यांनी विविध सामाजिक उपक्रमामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे : पोलीस उपनिरीक्षक चव्हाण.