१ किलो ७३० ग्रॅम अमली पदार्थ गांजा विक्री करीता जवळ बाळगणा-या दोन इसमांचे विरुध्द हिंजवडी पोलीसांची कारवाई

0

हिंजवडी :

पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड मधील पोलीस स्टेशन हदित चालणारे अवैध धंदे विरुध्द कारवाई करुन अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्याचे मा. पोलीस आयुक्त सो पिंपरी चिंचवड यांचे आदेश असलेने त्या अनुशंगाने मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो यांचे आदेशान्वये हिंजवडी पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे व अवैध धंदे विरोधी पथकाचे पोलीस अमंलदार पेट्रोलींग करत असतात.

दिनांक ४/०३/२०२३ रोजी सायंकाळी हिंजवडी पोलीस स्टेशन हदित पेट्रोलींग करीत असताना म्हाळुंगे नांदे रोड,गोदरेज साईट जवळ, म्हाळुंगे येथे दोन इसम गांजा विक्री साठी येणार असलेबाबत माहीती मिळाल्याने सदर माहीती सहा. पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सो विवेक मुगळीकर यांना दिली त्यांनी मार्गदर्शन करुन पुढिल कारवाई करणेचे आदेश दिले.

त्यांनतर सहा पोलीस निरीक्षक राम गोमारे व पोलीस स्टाफ असे छापा करवाईचे साहीत्य व दोन पंचासह मिळालेले बातमीचे जवळ जाऊन आडोशाला थांबुन ट्रॅप लावला असता थोडयाच वेळात त्या ठिकाणी एका टुव्हीलर गाडीवरुन दोन इसम हे घाईगडबडीत जात असल्याचे दिसले त्यांना गाडी थांबवीण्याचा इशारा केला असता ते पळुन जावु लागल्याने त्यांना वरील पोलीस स्टाफ ने पकडले व त्यांची तसेच त्यांचेकडील मोटार सायकलची झडती घेतली असता पांढ-या रंगाचे दोन प्लास्टीक पिशवी मिळुन आल्या त्यामधे १ किलो ७३० ग्रॅम अमली पदार्थ
गांजा मिळुन आला.

त्यांचे ताब्यातुन गांजासह एकुन ९५,९५०/- रुपये चा मुद्येमाल जप्त करुन त्यांचे विरुध्द एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ ( क ), २० ( ब ) (ii) ( ब ) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करणेत आला असुन सदर अरोपींची नावे खालीलप्रमाणे :
१) महादेव निवृत्ती मंडलीक वय ४२ वर्षे, धंदा टपरी, रा क्रांतीनगर, गल्ली नंबर ०४ घर नंबर ०९ संचेती
शाळे जवळ, थेरगाव, पुणे
२) विनोद बिजयपाल सिंग, वय-३८ वर्षे, धंदा टपरी, रा-खैरे यांच्या खोलीत म्हाळुंगेगाव, ता मुळशी जि पुणे.
मुळ रा-लवगाव, ता गाझीपुर, जि फत्तेहपुर, उत्तर प्रदेश

See also  लाच लुचपत विभागाची पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत धाड : भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेसह इतर तीन जणांना अटक

सदरची कारवाई मा.विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. मनोजकुमार लोहीया सह. पोलीस आयुक्त सो, मा. डॉ संजय शिंदे सो, अप्पर पोलीस आयुक्त साो. मा. काकासाहेब डोळे सो, पोलीस उप आयुक्त परि.२, मा. श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग वाकड, यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), अवैध धंदे विरोधी पथकाचे प्रमुख सपोनि अजितकुमार खटाळ, सहा. पोलीस निरीक्षक राम गोमारे, सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश वायबसे, पोहेकॉ/१०४१ संतोष डामसे, पोलीस अमंलदार/ २६५९ रवी पवार यांनी केली आहे.