पुणे:
लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत धाड टाकत सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेसह इतर तीन जणांना अटक केली आणि एकच खळबळ उडाली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या कार्यालयावर आज (बुधवारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धड टाकली आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंतची ही पहिलीच धाड आहे.
आज स्थायी समितीची सभा सुरू असतानाच टाकण्यात आलेल्या या धाडीमुळे खळबळ उडाली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीची बुधवारी होती. सभा दुपारी चालू झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समितीच्या कार्यालयावर धाड टाकली. अचानकपणे पडलेल्या धाडीमुळे पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर खळबळ उडाली आहे. सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तीन पुरुष व एक महिला अधिकारी स्थायी समितीच्या कार्यालयामध्ये अचानक आले. स्थायी समितीच्या अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्या कार्यालयाचा ताबा घेत कुलूपबंद केले. यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे या अधिकाऱ्यांनी मोर्चा वळविताच या ठिकाणी असलेल्या काही कार्यकर्त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष व पक्षनेत्यांना बाहेर काढले.
याच दरम्यान लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समितीचे कार्यालयही बंद करून त्यावर ताबा घेतला. या कारवाईदरम्यान दोन ठेकेदार कार्यालयातच अडकल्याची माहिती आहे. दरम्यान स्थायीची आज बैठक असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होती.