जागतिक कर्करोग दिनानिमित्त बाणेर बालेवाडी मेडीको असोसिएशन व मणिपाल हॉस्पिटल तर्फे रॅली.

0

बाणेर :

आज सकाळी जागतिक कर्करोग दिनानिमित्त मणिपाल हॉस्पिटल व बाणेर बालेवाडी मेडी को असोसिएशन यांच्या वतीने रॅली चे आयोजन करण्यात आले होते. सुमारे १५० डॉ व नागरिक तसेच रोटरी क्लबचे सदस्य ह्यात सहभागी झाले होते.

रॅली ची सुरवात कर्करोग तज्ञ डॉ राहुल वाघ व डॉ करण चांचलानी तसेच बी एम ए चे डॉ राजेश देशपांडे यांच्या हस्ते फ्लॅग दाखाऊन झाले. कर्करोगा विषयी जागृत तेचे फलक व माहिती देण्यात आली. सुमारे पाच किलोमीटर रॅली काढण्यात आली. नागरिकांनी पण उस्फुर्त प्रतिसाद दिला.

ह्या प्रसंगी कर्करोग होण्याची कारणे ,आधुनिक तंत्रज्ञान उपचार ह्या विषयी मणिपाल हॉस्पिटल डॉ राहुल वाघ ह्यांनी मार्गदर्शन केले.

कर्करोग जगृतीवर सम्यक रेहाब सेंटर तर्फे डॉ रुपाली चौधरी व सहकाऱ्यांनी पथनाट्य सादर केले.

ह्या कार्यक्रमास डॉ कविता चौधरी डॉ साळवे,डॉ दिनेश व रितू लोखंडे, डॉ दिपाली झंवर, डॉ जेठवणी, डॉ सदाफुले, डॉ सोनार, डॉ पाटील, डॉ डांगरे तसेच मणिपाल हॉस्पिटल चे ललित ससाले, प्रसाद जाधव उपस्थित होते.

भारतात कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत व प्राथमिक अवस्थेत जर निदान झाले तर खूप चांगल्या प्रकारे रुग्ण नीट होऊ शकतो. तसेच तम्ब्बाखु सिगारेट गुटखा चे व्यसन बंद करावे असे आवाहन करण्यात आले.

See also  वसुंधरा अभियान बाणेर कडून २११ रक्तदात्यांचे रक्तदान