कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवड मधून अश्विनी जगताप यांना भाजपची उमेदवारी…

0

पुणे :

भाजपचं कसबा आणि चिंचवड पोट निवडणूक लढायचं ठरलं आहे. दोन्ही पक्षांनी आपआपले उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपाकडून कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक साठी हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीसाठी श्रीमती अश्विनी लक्ष्मण जगताप यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आता मविआतून नेमकी कोणती घोषणा होणार, हे पहावं लागेल.

निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपाने कुणाच्याही नावांची घोषणा केली नव्हती. मात्र आज अखेर भाजपने या दोन्ही ठिकाणचे अधिकृत उमेदवार घोषित केले आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवड विधानसभेचे भाजपाचे माजी आमदार स्व. लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी निधन झाले. त्यामुळे चिंचवड विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे.

See also  पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सरकार्यवाह पदी रवींद्र आंदेकर, तर सहकार्यवाह पदी दत्तात्रय कळमकर यांची एकमताने निवड.