बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा..

0

बालेवाडी :

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. गृप कॅप्टन एम.एस.देशपांडे ( निवृत्त) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. बालेवाडी येथील अनेक नागरिक आणि फेडरेशनचे सदस्य यावेळी उपस्थित होते. कॅप्टन देशपांडे यांनी सैनिक जीवनातील अनुभव सांगितले आणि भारताच्या स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारतीय सैनिकांनी कसे प्रयत्न केले याची माहिती उपस्थितांना दिली. पहिले आणि दुसरे महायुद्ध, आजाद हिंद सेना व नौदलाचे बंड या बद्दल माहिती देऊन स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांचे योगदान किती मोठे होते यावर प्रकाश टाकला.

बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे याप्रसंगी दोन उपक्रमाची घोषणा करण्यात आली. सामान्यातील सामान्य नागरिकांनी केलेल्या असामान्य सामाजिक कामाबद्दल त्यांचा गौरव करण्यासाठी. ” बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन सिटिझन्स अवार्ड” या वर्षापासून सुरू करण्यात आला आहे. याबद्दल माहिती यावेळी देण्यात आली.

सामाजिक दायित्व म्हणून फेडरेशन विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. या उपक्रमाचा भाग म्हणून ” बाणेर-बालेवाडी, पाषाण रेसिडेंट असोशियेशन”, बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन आणि आदित्य ब्रिझ पार्क सोसायटी यांनी संयुक्तपणे “महा रक्तदान शिबीर” ११ फेब्रुवारीला आयोजित करण्यात येत आहे. या शिबिराची घोषणा आज करण्यात आली. दोन्ही उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन फेडरेशन आणि बाणेर बालेवाडी पाषाण रेसिडेंट असोशियेशन तर्फे करण्यात आले.

See also  बाणेर पाषाण लिंक रोड वरील लसीकरण केंद्र नगरसेविका स्वप्नाली सायकर यांच्या प्रयत्नातून सुरू.....