बाणेर पाषाण लिंक रोड वरील लसीकरण केंद्र नगरसेविका स्वप्नाली सायकर यांच्या प्रयत्नातून सुरू….. 

0

बाणेर :

नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांच्या प्रयत्नातून बाणेर पाषाण लिंक रोडवर करोना लसीकरण केंद्राचे उदघाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते झाले. बाणेर पाषाण लिंक रोड परिसरातील नागरिकांची बरेच दिवसापासून लसीकरण केंद्र सुरू व्हावे अशी मागणी होती, त्यानुसार हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की,पुणे शहरात १००च्या वर लसीकरण केंद्र सुरु झाली आहेत लवकरच आवश्यक तेथे उपलब्धतेनुसार नवीन केंद्र वाढविण्यासाठी प्रयत्न करु तसेच सध्या कोरोना चे प्रमाण कमी होत आहे. रुग्णांची संख्या घटली आहे ही दिलासादायक बाब आहे. तज्ञांच्या मते कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यासाठी लसीकरण हाच योग्य उपाय आहे. हे लक्षात घेऊन लसीकरण करणे गरजेचे आहे. महापालिका कोणतीही व्यवस्था राखण्यात कमी पडणार नाही परंतु नागरिकांनी स्वतः देखील काळजी घ्यावयास हवी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतल्यास लवकरच कोरोना पूर्णपणे हद्दपार झालेला असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रभागातील विस्तार पहाता मध्यवर्ती ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु झाल्याने या परिसरातील नागरिकांनी जी मागणी केली आंणि त्यांनुसार हे केंद्र सुरू झाल्याने या परिसरातील नागरिक धन्यवाद व्यक्त करत आहे, असे बाणेर पाषाण लिंक रोड समितीचे अध्यक्ष राजेंद्र चुत्तोर यांनी व्यक्त केले.

अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिक लसीकरण केंद्राची मागणी करत होते ती पुर्ण करण्यात यश आले. प्रभाग भौगोलिक दृष्ट्या मोठा असल्याने बालेवाडी, सुतारवाडी येथेही लसीकरण केंद्र व्हावी यांसाठी प्रयत्न करणार असे नगरसेविका स्वप्नाली प्रल्हाद सायकर यांनी मत व्यक्त केले. तसेच नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेवक बाबुराव चांदेरे, कोथरुड मतदार संघ भाजपा मंडल अध्यक्ष पुनित जोशी, औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयदीप पवार, आरोग्य अधिकारी संतोष मुळे, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, सचिन पाषाणकर, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, रविंद्र सिन्हा, लहु बालवडकर, उमा गाडगीळ, डाॅ.सुकुमार सरदेशमुख, डाॅ अजय मसकर, रामदासी सर, सुभाष भोळ, नवनाथ ववले, रोहन कोकाटे, स्वरुपाताई शिर्के, अस्मिता करंदीकर, मीनाताईपारगावकर, आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

See also  आयुष्यमान भारत योजनेचे नागरिकांनी लाभ घ्यावा : प्रकाश बालवडकर