सुसगाव मध्ये “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील विद्यार्थ्यांसोबत सहभागी..

0

सुसगाव :

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमांतर्गत दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला हा कार्यक्रम पुणे जिल्हा पालकमंत्री उच्च तंत्र शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी न्यू इंग्लिश स्कूल सुस येथे शाळेतील विद्यार्थ्यांसोबत दूरदृश्य प्रणाली द्वारे पाहिला. विद्यार्थांनी मोठया आस्थेने या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तराना आत्मसात केले.

यावेळी वेळी विद्यार्थांनी आपल्याला परीक्षे दरम्यान येणाऱ्या अडचणी संबंधात प्रश्न विचारले व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सविस्तर पणे विद्यार्थांना समर्पक उत्तरे देत त्यांचे समाधान केले. बोर्ड परीक्षेच्या आधी खास विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचे काम या निमित्त करण्यात आले. विद्यार्थांनी प्रधानमंत्रीनी दिलेल्या उत्तर टाळ्यांच्या कडकडाटात समाधान व्यक्त केले. परीक्षेत नक्कल करणाऱ्या विद्यार्थांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगीतले की, नक्कल करून ऐक दोन परीक्षा पास करू शकतात परंतू आयुष्याच्या परीक्षा पास नाहि करू शकत. परीक्षा येते जाते पण आपल्याला जिवन जगायचे शॉर्टकट नाहि वापरायचा. स्मार्टली हार्ड वर्क करायचा आहे. असे विविध प्रश्नांना उत्तर देत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचे समाधान केले.

गणेश कळमकर यांनी सूत्रसंचालन करत सुस येथिल विद्यार्थ्याना कार्यक्रमाची सखोल महिती दिली.

यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, माजी नगरसेविका, स्वप्नाली सायकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, सहकार आघाडीचे प्रकाश बालवडकर, ओबीसी नेते प्रल्हाद सायकर, कोथरूड विधानसभा उपाध्यक्ष सचिन दळवी, माजी स्वीकृत सदस्य शिवम सुतार,शरद भोते, माजी सरपंच नारायण चांदेरे, अनिल ससार, न्यू इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष गुलाब चांदेरे, माजी सरपंच मिरा देवकर, उत्तम ससार शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि स्टाफ उपस्थित होता.

 

See also  होम क्वारंटाईन नागरिकांसाठी घरपोच सेवेचे अभियान सुरु : सनी निम्हण यांचा अभिनव उपक्रम