बाणेर बालेवाडी मधील पाणीटंचाईच्या संदर्भात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन..

0

पुणे :

बाणेर – बालेवाडी मधील पाणीटंचाईच्या संदर्भात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी भेट घेऊन निवेदन देऊन समस्या मांडण्यात आली. बाणेर बालेवाडी मागील अनेक दिवसापासून पाण्याची टंचाई मोठया प्रमाणात जाणवत आहे. त्याची जाणीव निवेदन देऊन करून देण्यात आली.

यावेळी आयुक्त साहेबांनी सदरचा प्रश्न गांभीर्याने घेतला. तात्काळ पाणी टाकीवरील खराब झालेले ऑल, मोटारनवीन बसविण्याची व पाण्याचे नियोजन करण्यासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पाणी वेळेवर सोडण्याची ताकीद करण्यात आली.

याप्रसंगी निवेदन सादर करताना व चर्चा करताना स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश किसन बालवडकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, आनंदराव कांबळे, पोलीस पाटील दिलीप बालवडकर, हनुमंत बालवडकर, नरेंद्र बालवडकर, संदीप बालवडकर, महादेव कदम, संदीप गु बालवडकर, या सर्वांच्या उपस्थितीत सदरील विषय मार्गी लावण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिले.

See also  बाजार समिती सुरू ठेवण्याच्या उपाययोजना कराव्यात : संचालक सोनी.