शिवम सुतार यांच्या वतीने स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त मिठाई आणि महिलांना साड्या वाटप..

0

सुतारवाडी :

प्रभाग क्रमांक ९ सुतारवाडी, पाषाण, बावधन परिसरातील स्वच्छ्ता करणारे पुणे मनपा सेवक यांना मा. स्वीकृत नगरसेवक शिवम आबासाहेब सुतार यांच्या वतीने दिवाळी निमित्ताने मिठाई आणि महिलांना साड्या वाटप करण्यात आले.

याची माहिती देताना युवा नेते शिवम सुतार यांनी सांगितले की, आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्या करिता अविरत परिश्रम घेणाऱ्या स्वच्छ्ता कर्मारचाऱ्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील दिवाळी भेट म्हणून मिठाई वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. तसेच महिला सफाई कर्मचारी भगिनींना साड्या वाटप करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब सुतार, राजाभाऊ सुतार, अतुल सुतार, प्रसाद सुतार, शुभम ठाकूर, विकी तापकीर, राहूल बहिरमे आदी उपस्थित होते.

 

See also  सी एम इंटरनॅशनल शाळेने स्तुत्य उपक्रम : मुलांना कोविड संकटापासून दूर ठेवण्यासाठी वेबिनार सत्राचे आयोजन.