योगीराज पतसंस्थेत कर्तृत्वान महिलांच्या हस्ते लक्ष्मीपूजन संपन्न …

0

बाणेर :

योगीराज पतसंस्थेत लक्ष्मी पूजना निमित्त कर्तृत्वान माहिला अक्षरा इंटरनॅशनल स्कुलच्या संचालिका ज्योती राठोड, उद्योजिका चंद्रलेखा बेलसरे, स्पोर्ट्स अधिकारी कविता नावंदे, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर यांच्या शुभहस्ते तिजोरी पूजन करण्यात आले. तसेच राष्टीय युवा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सौरभ नावंदे यांचा संस्थेच्या वतीने ज्योती राठोड यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, सालाबादप्रमाणे याही वर्षी संस्थेत कर्तृत्वान महिलांच्या हस्ते तिजोरी पूजनाची परंपरा कायम ठेवली आहे. संस्था करत असलेल्या आर्थिक व सामाजिक कामात करत असलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. यावर्षी संस्थेच्या २५ कर्मचाऱ्यांना एक पगारवाढ, एक पगार बोनस व दिवाळी ऍडव्हान्स असे एकूण २० लाख ६३ हजार रुपयांचें वाटप करण्यात आले, असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.

याप्रसंगी ज्योती राठोड यांनी सांगितले की, यापूर्वी तापकीर आणि योगीराज पतसंस्था ज्ञात होती परंतू यांच्या कार्याची उंची आणि दर्जा किती मोठा आहे हे आज संस्थेत लक्ष्मी पूजना साठी आल्या नंतर कळले. संस्थेचे कार्य हे राज्यातील इतर संस्थांना प्रेरणादायी आहे असेही यावेळी सांगितले.

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक दिलीप फलटणकर यांनी याप्रंगी ज्ञानेश्वर तापकीर यांच्या २७ वर्षे करत असलेल्या सामाजिक कार्यावर गौरव ग्रंथ लिहण्याचा संकल्प सोडला. उपस्थितांनी यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे अश्वासन दिले.

योगीराज पतसंस्थेच्या वतीने गरीब मुलीच्या लग्नात संपूर्ण भांड्यांचा संसार योगीराज कन्यारत्न विवाह मदत योजने अंतर्गत दिला जातो त्या कार्यासाठी गोसेवक ह.भ.प.संजयबापू बालवडकर यांनी दरवर्षी संस्थेला १ लाख रुपये देण्याचे यावेळी आश्वासन दिले.

याप्रंगी उद्योजक जयेश राठोड, प्रमोदकुमार बेलसरे, तीर्थ डेव्हलपर्स चे संचालक विजय रौधळ, सहकार खात्यातील सेवा निवृत्त अधिकारी विनायक साखरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे डॉ. वझरकर, स्वामी समर्थ प्रतिष्ठान चे श्रीकांत पाटील्, खेमराज रणपिसे, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, सुधाकर धनकुडे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गणपतराव माडगुळकर, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, सर्व संचालक खातेदार, दैनंदिन बचत प्रतिनिधी व स्टाफ उपस्थित होते.

See also  बालेवाडी येथील एसकेपी कॅम्पस मध्ये जागतिक टेनिस हॉलीबॉल दिवस साजरा.

आलेल्या सर्वांचे स्वागत व सुत्रसंचालन संस्थेचे तज्ञ संचालक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रविंद्र घाटे यांनी केले तर सर्वांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते यांनी मानले.