सी एम इंटरनॅशनल शाळेने स्तुत्य उपक्रम : मुलांना कोविड संकटापासून दूर ठेवण्यासाठी वेबिनार सत्राचे आयोजन.

0

बालेवाडी :

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला विध्वंस आपल्या डोळ्यासमोर असताना लहान मुलांत कोरोना संसर्गाच्या केसेस दिसू लागल्या आहेत. तिसऱ्या लाटेत मुलांसाठी कोरोनाचा धोका हा अधिक आहे. असा इशारा जगभरातील तज्ज्ञांनी या आधीच दिला आहे. कोरोनाचा लहान मुलांना असलेला धोका आणि त्याबद्दलची पालकांमधील काळजीवजा अस्वस्थता लक्षात घेऊन बालेवाडी पुणे येथील सी एम इंटरनॅशनल या शाळेने प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ आणि पुण्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉ. संजय मानकर यांच्या खुल्या वेबिनार सत्राचे आयोजन पालकांसाठी करण्यात आले होते.

योग्य औषधोपचारांसोबत, योग्य ज्ञान हेच कोविड संकटात आपली शक्ती आहे. दुर्दैवाने मागील काळात केवळ योग्य माहितीच्या अभावी किंवा चुकीच्या माहितीमुळे लोकांनी प्राण गमावले आहेत. योग्य माहिती तज्ज्ञांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवण्यासाठी आणि जनजागृती साठी सरकारच्या प्रयत्नांना पूरक साथ देण्यासाठी आपण या खुल्या सत्राचे आयोजन केल्याचे आयोजक शाळेचे ट्रस्टी डॉ. सागर गणपतराव बालवडकरांनी यांनी सांगितले.

डॉ. मानकर यांनी या खुल्या सत्रात पालकांच्या सर्व शंकांचे सोप्या भाषेत निरसन केले. मुलांना संसर्ग होण्याच्या केसेस समोर येत असल्या तरीही फक्त अपवादात्मक केसेस या गंभीर स्वरूपाच्या आहेत असे त्यांनी सांगितले. नवजात बालक ते १२ वर्षामधील मुलांना covid चा धोका हा किशोरवयीन वयोगटातील मुलांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. Covid मुळे Covid नंतर मुलांत होणाऱ्या MIS किंवा कावसाकी या रोगपरिणामांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे घाबरून न जाण्याचे आव्हान त्यांनी केले.

सी एम इंटरनॅशनल शाळेने उचललेल्या या स्तुत्य पाऊलाचे अनुकरण इतर शाळांनी केले तर तिसऱ्या लाटेआधी सरकार मोठ्या प्रमाणात शाळांची जनजागृती साठी मदत घेऊन लहान मुलांना कोविड संकटापासून दूर ठेऊ शकेल, हे या निमित्ताने अधोरेखित होते.

See also  बालेवाडी येथे वडाचे रोप आपल्या दारी या संकल्पनेतून वटपौर्णिमा साजरी.