मंदार घुले पाटील युवा मंच आणि महाराजा प्रतिष्ठान आयोजत भव्य रास दांडिया महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..

0

बावधन :

मंदार घुले पाटील युवा मंच आणि महाराजा प्रतिष्ठान बावधन यांच्या वतीने सूर्यदत्ता कॉलेज पाटील नगर येथे भव्य रास दांडिया महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषाल पुणे जिल्हा परिषद सदस्या पुणे/सह अध्यक्षा, इसमा कायदेशीर समितीच्या अंकिताताई पाटील-ठाकरे, सिने अभिनेत्री मोनालिसा बागल, अभिनेता आदित्यराजे मराठे, अभिनेत्री ऐश्वर्या दौंड आणि दिग्दर्शक/डायरेक्टर चेतन सागडे यांच्या प्रमूख उपस्थित संपन्न झाला.

या कार्यक्रमाची माहिती देताना युवा नेते मंदार घुले पाटील म्हणाले की, नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसानंतर नागरिकांना एकत्र येऊन जल्लोष करण्याची संधी उपलब्ध करण्याच्या हेतूने हा रास दांडिया महोत्सव आयोजित केला होता. परिसरातील नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहत या कार्यक्रमाची शोभा वाढविली आणि आनंद उपभोगला त्याबद्दल उपस्थितांचे आभार आहे.

या कार्यक्रमाला माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, गोरख दगडे जिल्हाध्यक्ष ग्रामविकास आघाडी, हिमालय नागरी पतसंस्था संचालक राजेंद्र बांदल, युवा नेते लहु बालवडकर, राहुल कोकाटे, शिवम सुतार, जीवन साखरे, रोहनजी कोकाटे, अक्षितसर कौशल, राजसक लहाणे, समस्त ग्रामस्थ बावधन आणि परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंदार घुले पाटील, अध्यक्ष भाजपा ग्रामविकास आघाडी मुळशी आणि ग्रामपंचायत सदस्या कल्पना महेश घुले पाटील यांच्या संकल्पनेतून हा भव्य रास दांडिया महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

See also  'जायका'प्रकल्प उभाणीसाठी केवळ बैठका : मोहन जोशी