पुणे बार असोसिएशन तर्फे व्याख्यानाचे आयोजन…

0

शिवाजीनगर :

पुणे बार असोसिएशन तर्फे शुक्रवार दिनांक १५/०९/२०२२ रोजी श्री. अविनाश देशमुख यांचे ‘ब्रेन जिम’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

अविनाश देशमुख यांनी मेंदूच्या कार्यक्षमता वाढविण्यासाठी व एकाच वेळेस मल्टी टास्किंग करण्याचे  तंत्रज्ञान कसे अवगत करावे याबाबत मार्गदर्शन केले. आपली बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी आपली सध्याची शिक्षणप्रणाली अनुकूल नसून.. जास्तीतजास्त कृतीभिमुख  शिक्षण देण्याची काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्या गोष्टींचा आपण वापर करणे बंद करतो कालांतराने त्या गोष्टी आपण विसरून जातो त्या आपल्या मेंदूच्या पटलावरून नाहीश्या होतात त्यामुळे आपल्याला अनुकूल असलेल्या सर्व गोष्टींची कृती आपण दैनंदिन आयुष्यात करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी वेगेवेगळ्या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आपण आपल्या मेंदूची कार्यक्षमता कशी वाढवू शकतो याबाबत ऊपस्थितांना मार्गदर्शन केले.

तसेच पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष पांडुरंग थोरवे म्हणाले की, वकील मंडळी सतत धावपळीत असतात कोणत्या ना कोणत्या तणावाखाली असतात तसेच वकिली व्यवसायात बौध्दिक कसरत मोठ्या प्रमाणावर होत असते. अश्या वेळेस त्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ रहावे व दैनंदिन कामकाज करत असताना एकाच वेळेस अनेक पातळ्यांवर काम करणे त्यांना सोपे जावे यासाठी या मार्गदर्शनाचा नक्कीच सदुपयोग होणार आहे.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे हिशोब तपासणीस- ॲड.शिल्पा कदम यांनी केले. तसेच  पुणे बार कार्यकारिणी सदस्य ऍड. सई देशमुख यांनी आभार मानले.

याप्रसंगी पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड विवेक भरगुडे, उपाध्यक्ष ऍड. लक्ष्मणराव येळे पाटील, सचिव ॲड. अमोल शितोळे, सचिव ॲड. सुरेखा भोसले खजिनदार ॲड. प्रथमेश भोईटे, व  कार्यकारिणी सदस्य – ॲड. काजल कवडे, ॲड. अर्चिता जोशी, ॲड. मजहर मुजावर, ॲड. अमोल भोरडे, ॲड. अजय नवले,  ऍड. अमोल दुरकर ॲड.तेजस दंडागव्हाळ,ॲड, कुणाल अहिर,  ऍड. रितेश पाटील तसेच मोठ्या संख्येने वकील बांधव उपस्थित होते

See also  ऑक्सिजन पुरवठा कमी पडू लागल्या मुळे आरोग्य सेवेत गोंधळ