सचिन मानवतकर यांच्यातर्फे औंध येथील इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना तिरंगा भेट..

0

औंध :

आझादी का अमृत महोत्सव “हर घर तिरंगा अभियान” संपूर्ण देशात साजरा होत असताना या अभियानात सहभागी होण्याकरिता जनजागृती व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व सचिन मानवतकर यांच्यातर्फे औंध येथील इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय येथे सर्व विद्यार्थ्यांना तिरंगा भेट देण्यात आला व खाऊ वाटप करण्यात आला.

याबद्दल माहिती देताना भाजपा युवा नेते सचिन मानवतकर म्हणाले की, स्वातंत्र्य दिन आला की लहान मुलांमध्ये उत्साह संचारलेला असतो. लहान मुलांचा हा उत्साह द्विगुणित व्हावा व स्वतः बरोबर घरात देखिल या मुलांकडून हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती व्हावी म्हणून मुलांना तिरंगा ध्वज भेट देवून खाऊ वाटप करण्यात आला. लहान मुलांना मिळालेली तिरंगा ध्वज भेट त्यांच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेली.

या प्रसंगी युवा नेते सचिन मानवतकर, शाळेच्या मुख्याध्यापिका शिरगावकर मॅडम, राम मंडलिक, अनिकेत सरोदे, मनोज ठोसर, मारुती काकडे, शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

See also  सनी निम्हण यांच्या वतीने 'डेंग्यू नियंत्रण औषध फवारणी मोहीम!' चे आयोजन.