प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डाॅ. गजानन एकबोटे यांचा ७० वा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा

0

पुणे :

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शिवाजीनगर येथील सभागृहात संस्थेचे कार्याध्यक्ष मा डाॅ गजानन र एकबोटे यांचा ७० वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणेशाच्या अभिषेकाने झाली. यानंतर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.या प्रसंगी ८५ बाटल्या रक्त संकलन झाले. हा उपक्रम जनसेवा फाउंडेशन सोबत घेण्यात आला.
या नंतर सुकामेवा तुला करण्यात आली. शाळा व महाविद्यालयाच्या शिकत्तेतर कर्मचाऱ्यांना रेनकोट्स चे वाटप करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य रक्षणासाठी प्रथमोपचार किट्स् चे वाटप शाळांना करण्यात आले. शाळेतील विद्यार्थांसाठी वह्या वाटपाचा कार्यक्रम झाला.

संस्थेच्या आवारात मा डाॅ एकबोटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या निमित्त पी ई सोसायटी तर्फे अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डाॅ अरविंद पांडे म्हणाले डाॅ गजानन एकबोटे संस्थेत येणे हा संस्थेसाठी “टर्निंग पाँईट ठरला. त्यानंतर संस्थेने खुप प्रगती केली आहे.”
डाॅक्टरांना देण्यात आलेल्या मानपञाचे वाचन डाॅ वैजयंती जाधव यांनी केले.

या प्रसंगी बोलताना पद्मविभूषण डाॅ के एच संचेती, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ म्हणाले,” डाॅक्टर एकबोटे म्हणजे खुप कष्ट करुन शिक्षण घेऊन घडलेले एक प्रसन्न व्यकिमत्व ज्यांनी अनेक गुणवान विद्यार्थी घडवलेव सामाजिक भान असलेली पिढी ते संस्थेत घडवीत आहेत.

आमदार सिध्दार्थ शिरोळे म्हणाले” सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात काम करणारे असे अष्टपैलू व्यक्तीमत्व डाॅ गजानन एकबोटे हे आहे.”

संस्थेचे आध्यक्ष विध्नहरी महाराज देव म्हणाले, ” सर्व प्रकारच्या झगड्यांमधुन ही संस्था बाहेर काढून ही संस्था प्रगतीपथावर आणण्याचे श्रेय डाॅ एकबोटे सरांना जाते. त्यांचे तेजस्वी आणि ओजस्वी व्यक्तिमत्त्व नेहमीच सर्वांना प्रोत्साहन देत राहिल.”

सत्काराला उत्तर देताना पी इ सोसायटीचे कार्यवाह मा डाॅ गजानन एकबोटे म्हणाले,” माझ्या आयुष्यात ज्या दोन व्यक्तीचा महत्वाचा वाटा आहे आज त्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत याचा मला आनंद आहे. मला लाभलेली टीम हि देवदुर्लभ आहे. सगळ्यांच्या सहकार्याने पी ई सोसायटी मोठा ठसा उमटवून शकली. माझे आई वडील, कुटुंबीय यांचा मी नेहमीच आभारी राहीन.”

See also  औंध येथील जगदंब ढोल ताशा पथकाच्या सरावाला सुरुवात.

या संपूर्ण कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यवाह प्रा शामकांत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरवात प्रा प्रियांका भट यांच्या गणेशवंदनाने झाली. विद्यार्थी आदित्य पवार याने सरांचे उत्कृष्ठ चिञ बनवून दिले सरांना भेट दिले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्राचार्य डाॅ झुंझारराव यांनी केले. कार्यक्रमाचे सुञ संचलन डाॅ मृगजा कुलकर्णी यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डाॅ जोत्स्ना एकबोटे, सहकार्यवाह, डाॅ निवेदिता एकबोटे व एकबोटे कुटुंबीय यांची होती. विविध क्षेत्रातील मान्यवर, सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व नियामक मंडळाचे सदस्य, पदाधिकारी,शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.