जम्मू-काश्मीर मध्ये सुरक्षा दलांनी या वर्षी 118 दहशतवादी मारले…

0

जम्मू-काश्मीर :

जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या टार्गेट किलिंगनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑलआउट अधिक तीव्र केलंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षात आतापर्यंत 118 दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये 32 विदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे.

काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिलीय. या वर्षात आतापर्यंत काश्मिर खोऱ्यात 32 परदेशींसह 118 दहशतवादी मारले गेले आहेत. यातील 77 दहशतवादी लष्करचे आणि 26 दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे आहेत. गेल्या वर्षी 2021 मध्ये याच कालावधीत दोन परदेशी दहशतवाद्यांसह एकूण 55 दहशतवादी मारले गेले होते.

पुलवामा एन्काऊंटरमध्ये चार दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मिरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांच्या ऑपरेशन ऑलआउट अंतर्गत इन्काउंटरमध्ये चार दहशतवाद्यांना मारले. यापैकी तीन दहशतवादी बारमुल्ला आणि एका दहशतवाद्याला पुलवामामध्ये ठार करण्यात आले.

शेतात नेऊन पोलीस उपनिरीक्षकावर गोळीबार

आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी जैश ए मोहम्मदचा सदस्य होता. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी पोलीस उपनिरीक्षकाच्या घरात घुसून गोळीबार केला होता. दहशतवाद्यांनी फारूख अहमद मीर यांच्या घरातून त्यांचं अपहरण केलं. यानंतर शेतात नेऊन त्यांच्यावर गोळीबार केला.

या अगोदर 20 जूनला सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारले. यातील दोन दहशतवाद्यांना कुपवाडा आणि एका दहशतवाद्याला पुलवामा जिल्ह्यात मारण्यात आले. 19 ते 21 जून दरम्यान झालेल्या एन्काऊंटरमध्ये 11 दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश मिळाले आहे.

See also  भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर जगात सर्वाधिक असेल : अर्थतज्ज्ञ आशिमा गोयल