भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त.

0

मुंबई :

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. मिताली राज हिने बुधवार, ८ जून रोजी तिच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या ३९ व्या वर्षी मिताली राज हिने क्रिकेटला अलविदा केलं आहे.

मिताली हिने क्रिकेटमध्ये २३ वर्षे भारताचं प्रतिनिधित्व केले होते. लेडी सचिन तेंडुलकर म्हणूनही मिताली हिला ओळखले जायचे.

भारतीय संघाची धडाकेबाज फलंदाज म्हणून मिताली राजची ओळख होती. आज ट्विटरवरुन मिताली हिने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. क्रिकेटच्या तीनही प्रकारात म्हणजेच टी- २०, वन-डे आणि कसोटीमध्ये तिने भारतीय संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती.

मिताली राज हिने ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रत्येक प्रवासाप्रमाणेच या प्रवासाचा शेवट झाला आहे. आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. आता ही जबाबदारी संघातील तरुण आणि क्षमता असलेल्यांना जबाबदारी सोपवण्याची वेळ आलेली आहे. हा प्रवास सुंदर होता,’ अशा भावना मिताली राज हिने व्यक्त केल्या आहेत. बीसीसीआय, इतर अधिकारी आणि चाहत्यांचे आभारही तिने मानले आहेत.

https://twitter.com/M_Raj03/status/1534454266324205568?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1534454266324205568%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  भारतानं ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी धुव्वा उडवून अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या फायनलमध्ये केला प्रवेश