पुणे पोलिस आयुक्तालयात लवकरच सहा नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती. बाणेर मध्ये होणारा पोलीस ठाणे. 

0

पुणे :

पुणे पोलिस आयुक्तालयात लवकरच सहा नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहेत. त्यामध्ये वाघोली, नांदेड सिटी, बाणेर, काळेपडळ, खराडी, उरळीकांचन पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. यासंदर्भात आज (दि. ४ जानेवारी) मुंबईत बैठक  आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पुण्यातील हडपसरचे आमदार चेतन तुपे, वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे, शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्यासह पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित राहणार आहेत.

शहर आणि पुणे ग्रामीणमध्ये अस्तित्वात असलेल्या लोणीकंद पोलिस ठाण्याचे विभाजन करून वाघोली, लोणीकाळभोरचे विभाजन करून ऊरळीकांचन, हवेलीचे विभाजन करून नांदेडिसिटी, चतुःश्रृंगीचे विभाजन करून बाणेर, हडपसरचे विभाजन करून काळेपडळ तर चंदननगरचे विभाजन करून खराडी पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. दरम्यान, नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती 26 जानेवारीच्या मुहूर्तावर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

See also  डॉ. आंबेडकरांच्या विचारांची महती 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता फेसबुकवर !