सातारा ते कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामांना वेग !

0

पुणे :

महाव्यवस्थापकासह मध्य रेल्वेच वरिष्ठ अधिकारी कराड, सांगली, मिरज व कोल्हापुरची पाहणी करणार आहेत. मध्य रेल्वेच्या सातारा-पुणे विभागाची वार्षिक तपासणी गतवर्षी जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्यासह मध्य रेल्वेच्या सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली होती.

त्यांनी सातारा, वाठारस्टेशन, लोणंद, निरा, वाल्हे, जेजुरी पुणे अशी पाहणी केली. पुणे येथे सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या.याच धर्तीवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक जानेवारीमध्ये सातारा ते कोल्हापूर मार्गाची पाहणी करणार असल्याचे समजते. या मार्गावर मध्य रेल्वेकडून विविध कामे युध्दपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. शिवाय मध्य रेल्वेच्या सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीही या मार्गावर वाढल्या आहेत. पुणे-मिरजकोल्हापूर या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम मध्य रेल्वेमार्फत युध्दपातळीवर सुरू आहे. कोल्हापूर ते मिरज या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

मध्य रेल्वेच्यावतीने सातारा ते कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी तसेच वार्षिक तपासणी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सातारा ते कोल्हापूर या ट्रॅकची पाहणी करण्यासाठी जानेवारी महिन्यात येण्याची शक्यता आहे. यानुसार मध्य रेल्वेच्या विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गाठी भेटी सातारा ते कोल्हापूर दरम्यान असणाऱ्या स्थानकांवर वाढल्या आहेत.

मिरज ते सातारा मार्गाचे तसेच रेल्वेच्या सिग्नल व टेलीकॉम डिपार्टमेंटचे काम सुरू आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर रेल सुरक्षा आयुक्त या मार्गाची तपासणी करून रेल्वे मंत्रालयाकडे अहवाल पाठवणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने सिग्नल दिल्यानंतर हा मार्ग रेल्वेसाठी सुरु होणारआहे. रेल्वे मंत्रालयाने पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गाच्याविद्युतीकरणासाठी 513 कोटीचा निधी दिला आहे.

विभागीय रेल्वे आणि पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑल इंडियामध्ये करार झाल्यानंतर हा निधी वर्ग करण्यात आला. त्यानंतर कोल्हापूर ते पुणे या 326 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे.

या रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी भराव टाकण्याचे काम सुरू आहे. तर काही ठिकाणी टेलिफोन विभागाचीही कामे रेल्वेने हाती घेतली आहेत. पुणे ते कोल्हापूर मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाने गती घेतली आहे. सध्या कोल्हापूर ते मिरज 47 किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

See also  महाराष्ट्राच्या एनसीसी ग्रुपला तब्बल सात वर्षानंतर उत्कृष्ट कामगीरी करत मानाचा पंतप्रधानांचा ध्वज हा बहुमान

मिरज ते शेणोली 53 किलोमीटर व जेजुरी ते पुणे 32 किलोमीटर व फुरसुंगी ते पुणे 12 किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.  सातारा 132 किलोमीटरचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सातारा रेल्वे स्थानक परिसरात विविध विभागाची कार्यालय व निवासस्थानांचीकामे सुरू आहेत.