डॉ. आंबेडकरांच्या विचारांची महती 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता फेसबुकवर !

0

पाषाण :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील आजवर कधीही न ऐकलेल्या काही पैलूंचा उलगडा दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मिलिंद कांबळे करणार आहेत. त्यांचा हा अनोखा ऑनलाइन संवाद बुधवार दि. 14 एप्रिल या डॉ. आंबेडकरांच्या जयंतीदिनी सकाळी दहा वाजता सनी निम्हण यांच्या फेसबुक पेजवरून लाइव्ह प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

महामानवाच्या आयुष्यातील विविध पैलूंचे नव्याने केलेले विश्लेषण सर्वांनाच उद्बोधक ठरेल यासाठी दि. 14 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता सनी निम्हण यांच्या फेसबुक पेजवर जरूर ऐकावे व इतरांनाही त्यासंदर्भात सांगावे, असे आवाहन सोमेश्वर फाउंडेशनचे विश्वस्त व माजी नगरसेवक सनी ऊर्फ चंद्रशेखर विनायक निम्हण यांनी केले आहे.

सनी निम्हण यांनी माहिती देताना सांगीतले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सर्वांसाठी आदर्श व्यक्तिमत्व राहिले आहे. त्यांच्या प्रत्येक पैलू मधील नवीन काहीतरी शिकायला मिळते. म्हणूनच सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या आचार विचारातून नवीन काहीतरी शिकायला मिळावे या हेतूने हा अनोखा ऑनलाईन संवाद आयोजित केला आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घेऊन इतरांनाही त्याबद्दल माहिती द्यावी.

See also  पाषाण सुतारवाडी तळ्याजवळ पुन्हा आढळला गवा!!