सिंधुदुर्ग:-
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १५ जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.मुदत संपणाऱ्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र निवडणुकीआधीच वैभववाडीत राजकारण तापू लागलं आहे. वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या १०३ जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यातील २८ ग्रामपंचायत सदस्य राणेंच्या पुढाकाराने बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून नारायण राणे यांचं सिंधुदुर्गातील वर्चस्व कायम असल्याचं दिसून येतं आहे.
सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध राणे यांच्यात जोरदार फाईट आहे. अशातच भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा जोर का झटका दिला आहे. नितेश राणे यांच्या पुढाकाराने २८ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.