आरटीई 25 टक्के अंर्तगत प्रवेशासाठी 29 एप्रिलपर्यंत मुदतवाढ..

0

मुंबई :

आरटीई 25 टक्के अंर्तगत आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून यासाठी प्रवेश अर्जाच्या मुदतीत 29 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्यासोबतच आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश घेताना निवसी पुरवा म्हणून अकरा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा नोंदणीकृत भाडेकरार ग्राह्य धरला जाणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार 2022 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत येथे काढण्यात आली आहे. 4 एप्रिलल पोर्टलवर निवड यादी व प्रतिक्षा यादी घोषित करण्यात आली आहे. 90,688 विद्यार्थ्यांची निवड यादी तर 69, 859 विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी आरटीई पोर्टलवर जाहीर करण्यात आली आहे. तसेच 200 दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. निवड यादीतील व प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना SMS पाठविण्यात आलेले आहेत.

राज्यातील आरटीई प्रवेशाच्या अर्जासाठी 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता मुदतवाढ मिळण्याबाबत काही जिल्हयांनी तसेच काही पालकांनी, संस्थांनी व लोकप्रतिनिधींनी संचालनालयास विनंती केली आहे. पालकांना होणारी अडचण संचलनालयाच्या लक्षात आले. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊन त्यांची प्रवेशाची संधी त्यांना मिळावी जाऊ यासाठी आरटीई प्रवेशासाठी 29 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राथमिक संचलनालयाकडून सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी आणि उपसांचालक याना शाळांना या सूचना निर्देश देण्यात आले आहेत.

See also  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाठवणार राज्यपालांकडे राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नवी यादी..