बावधन :
बावधन येथे युवा नेते मंदार घुले (अध्यक्ष मुळशी तालुका भाजपा ग्रामविकास आघाडी ) आणि कल्पना महेश घुले यांच्या वतीने परिसरातील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा मिळाव्यात यासाठी जनसंपर्क कार्यालयात मोफत आधार कार्ड शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मोहिमेची माहिती देताना युवानेते मंदार घुले यांनी सांगितले की, नागरिकांना आवश्यक असणारे आधार कार्ड सहज सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे. शिवाय आधार कार्ड मध्ये आवश्यक असणाऱ्या दुरुस्त्या नागरिकांना करता याव्या या उद्देशाने नागरिकांसाठी या परिसरात आमच्या जनसंपर्क कार्यालयात मोफत आधार कार्ड शिबीर राबविण्यात आले आहे. तरी नागरिकांना विनंती आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेवून नवीन आधार कार्ड बनविणे, आधार कार्ड मधील दुरुस्त्या करणे, मोबाईल नंबर लिंक करणे अशा सुविधांचा फायदा घ्यावा.
हे मोफत आधार कार्ड शिबिर मंदार घुले यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये 23/ 3 / 2022 रोजी सकाळी 10 : 00 ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू असणार आहे, याची परिसरातील नागरिकांनी नोंद घ्यावी.