चला हवा येऊ द्या, कार्यक्रमाची बाणेर मध्ये हवा…! जयेश मुरकुटे यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन.

0

बाणेर :

बाणेरमध्ये प्रथमच जयेश संजय (नाना) मुरकुटे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम रूपाली चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग/ प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये घेण्यात आला. यावेळी नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच मराठी बांधवांची आवड असणारा नाद बैल गाड्यांचा या गाण्याचे गीत प्रदर्शन यावेळी करण्यात आले. वसुंधरा अभियानाच्या सर्व सभासदांचा सन्मान करण्यात आला.

भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांच्या दिलखुलास विनोदी अभिनयाला प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात दाद दिली. तसेच सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या सोबत वयोवृद्ध महिलांनी देखील नृत्य करण्याचा आनंद घेतला. चला हवा येऊ द्या कार्यक्रमाची बाणेर मध्ये हवा झाली.

जयेश मुरकुटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, कोरोना काळामध्ये केलेल्या जनसेवे मुळे सर्वांचे आशीर्वाद जयेश सोबत आहेत. नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण वाढदिवसानिमित्त केले आहे. ज्या समाजात आपण लहानाचे मोठे झालो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही सामाजिक भावना जोपासत वाढदिवस साजरा केला ही आनंदाची बाब आहे. संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. संघर्ष केला म्हणूनच आज एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक जयेश यांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित आहे. सर्वांच्या वतीने जयेश यांना शुभेच्छा देत आहे.

यावेळी नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेविका ज्योती कळमकर, लहू बालवडकर, अनिकेत मुरकुटे, नारायण चांदेरे, विशाल गांधिले, अशोक मुरकुटे, माजी नगरसेविका रंजना मुरकुटे, संजय (नाना) मुरकुटे, प्रमिला मुरकुटे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, नगरसेवक अमोल बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, विशाल वाकडकर, डॉ. राजेश देशपांडे, वसुंधरा अभियानाचे सर्व सभासद आणि जयेश मुरकुटे मित्रपरिवार तसेच बाणेर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  महेश सुतार यांचा समर्थकांनसह शिवसेनेत प्रवेश!