माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भक्तिरंग भजन स्पर्धेमध्ये जोगेश्वरी महिला मंडळ व ज्ञानाई भजनी मंडळ यांनी पटकावला प्रथम क्रमांक.

0

पाषाण :

पुण्यातील शिवाजीनगरचे लाडके माजी आमदार व प्रसिद्ध उद्योजक विनायक निम्हण यांच्या ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त साधून सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या संकल्पनेतून पुणे शहरात विठू माऊलींच्या भक्तांसाठी “भक्ती रंग” ही भजन स्पर्धा आयोजित केली होती. सांप्रदायिक क्षेत्रातील भजन कीर्तन साठी ऑनलाईन मानाचे व्यासपीठ सनी निम्हण यांनी उपलब्ध करून दिले होते. त्याची ऑफलाईन पद्धतीने अंतिम फेरी आणि बक्षिस वितरण समारंभ ४ ऑगस्ट रोजी समस्त निम्हण विठ्ठल मंदिर, पाषाण येते मोठया उत्साहात संपन्न झाला.

मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या स्पर्धेला पुणे शहारातील जवळपास महीला ५० संघ आणि पुरुष ८ संघ अशा ५८ संघांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. बऱ्याच दिवसांनी टाळ, मृदंग, अभंगाच्या निनादात समस्त निम्हण विठ्ठल मंदिर पाषाण परिसर दनदनुन गेला. सनी निम्हण यांनी आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून सांप्रदायिक क्षेत्रातील भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी भक्तिरंग स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न केली. ‘ठायीच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा’ असा दिव्य अनुभव आणि आनंद या स्पर्धेमुळे स्पर्धकांना घेता आला.

या वेळी आयोजक माजी नगरसेवक सनी निम्हण, नितीन निम्हण, शिवसेना नेते संजय निम्हण, बाळासाहेब बामगुडे, स्विकृत सदस्य सचिन पाषाणकर, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, वारकरी क्षेत्रातील मान्यवर हभप शांताराम निम्हण, हभप पांडूरंग दातार, हभप मारूती कोकाटे, हभप कृष्णा भोते, ॲड. नितीन कोकाटे, गोविंद रणपिसे, हभप अंकुश दगडे हभप जाधव, आणि या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले हभप हरिदास गुजर, हभप उद्धव गोरे बक्षिस वितरण समारंभ सूत्रसंचालन नितिन निम्हण यांनी केले तर आभार शिवसेना नेते संजय निम्हण यांनी मानले.

महिला विभाग विजेते :

१. जोगेश्वरी महिला भजनी मंडळ सुतारवाडी

२. स्वरांजली महिला भजनी मंडळ ताथवडे

३. कृष्णाई महिला भजनी मंडळ बावधन खुर्द

उत्तेजनार्थ :

See also  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपणाचे आयोजन : संतोष तोंडे

हरिओम महिला भजनी मंडळ सेनापती बापट रोड

कृष्णाई महिला भजनी मंडळ चिंचवड

विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ बावधन

जय माला महिला भजनी मंडळ जुनी सांगवी.

उत्कृष्ट हार्मोनियम वादक:

जय मला भजनी मंडळ सांगवी

उत्कृष्ट पखवाज वादक :

स्वरांजली महिला भजनी मंडळ ताथवडे

उत्कृष्ट तबला वादक :

कृष्णाई भजनी मंडळ चिंचवड

पुरुष विभाग विजेते

१. ज्ञानाई भजनी मंडळ नांदेड सिटी

२. जय गणेश भजनी मंडळ हडपसर

३. औंध गाव भजनी मंडळ

४. सोमेश्वर वाडी भजनी मंडळ

५. सुतारवाडी भजनी मंडळ