कर्वे रस्त्यावर नवीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरु होणार 

0

पूणे :

पुणे शहर हे महाराष्ट्र राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं शहर आहे. माहिती तंत्रद्यान सेवा देणाऱ्या कंपन्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात यायला लागल्या तेव्हापासून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनांची संख्या पण वाढली.

पुणे शहरात सार्वजनिक वाहतुकीची सोय मोठया प्रमाणात उपलब्ध नसल्याने पुणेकर मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनांनी प्रवास करतात. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामान करावा लागतो. पुणे शहरातील रहदारीच्या काही रस्त्यांवर वाहतूक कोंडी आता नित्याचीच झाली आहे.

कर्वे रस्ता हा नियमित वाहतूक कोंडी होणारा पुणे शहरातील रस्ता होय, परंतु आता कर्वे रस्त्यावर नवीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरु होणार असल्यामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठया प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून या पुलाच्या कामाचा अंतिम आढावा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रो आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत घेतला आहे. येत्या काही दिवसात या कर्वे रस्त्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण होणार असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी सुरु केला जाणार आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे असताना महापालिकेच्या २०१७-१८ अंदाजपत्रकात या उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग प्रस्तावित झाल्यावर नळस्टॉप येथे दुमजली पूल साकारण्यासाठी महापौर मोहोळ यांनी पाठपुरावा करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन केले होते. जयपूर येथील साकारलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली होती.

See also  ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी साठी 'शरद शतम्' आरोग्य कवच विमा योजना लागू करण्यासाठी समिती गठित : धनंजय मुंडे