पुणे महानगरपालिकेत भाजप पुर्ण बहुमत मिळवणार : आमदार चंद्रकांत पाटील

0

पुणे :

पुणे महानगरपालिका भारतीय जनता पार्टीकडून ताब्यात घेण्याचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस पाहत असली तरी त्या पक्षाच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल आणि भाजपा पुणे महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवेल,असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांजरी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेचा वापर करून महानगरपालिकेत नव्याने काही गावांचा समावेश केला.

तथापि,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ झालेले मतदार गावांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने तेथे भाजपालाच मते मिळतील. तसेच पुण्यात प्रभाग रचना करताना मोठ्या प्रमाणात मोडतोड केली असली तरी भाजपाचा मतदार सर्वत्र कायमच आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणूक भाजपा पूर्ण बहुमताने जिंकेल आणि पुणे महानगरपालिका ताब्यात घेण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वप्नाचा चक्काचूर होईल असा दावा त्यांनी केला.

See also  अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांचा खेळ : अर्थतज्ञ अजित अभ्यंकर