रेल्वे प्रवाशांना प्रवासाच्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या स्टेशनवरून ट्रेन पकडता येणार

0

नवी दिल्ली :

रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही तुमच्या प्रवासाच्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या स्टेशनवरून ट्रेन पकडू शकता.

यासाठी रेल्वे तुमच्याकडून कोणताही दंड वसूल करणार नाही. तुम्ही ज्या ठिकाणाहून तिकिट काढलेले असते त्याला बोर्डिंग स्टेशन म्हणतात. आधी तुम्ही तुमच्या बोर्डिंग स्टेशनवरूनच ट्रेनमध्ये चढणे अपेक्षित असायचे. बोर्डिंग स्टेशन बदलण्यासाठी तुम्हाला तिकिटात बदल करावा लागतो. नाहीतर प्रवाशांना दंड भरावा लागतो. आता मात्र तुम्हाला तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलून प्रवास करता येणार आहे.

बुकिंग केलेल्या तिकिटात बदलू शकता बोर्डिंग स्टेशन

अनेकवेळा प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलण्याची आवश्यकता भासते. मात्र बोर्डिंग स्टेशन प्रवाशासाठी लांब असल्यास ट्रेन चुकण्याची शक्यतादेखील असते. त्यामुळे जर ट्रेन प्रवाशाला जवळ असणाऱ्या स्टेशनवर थांबणार असेल तर प्रवासी आपले बोर्डिंग स्टेशनदेखील बदलू शकतात. आयआरसीटीसीच्या प्रवाशांची ही गरज लक्षात घेऊन बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा देते आहे. आयआरसीटीसीच्या या सुविधा त्या सर्व प्रवाशांसाठी आहेत ज्यांनी ट्रेनचे तिकिट बुकिंग ऑनलाइन केले आहे. ट्रॅव्हल एजन्ट आणि पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टमने केलेल्या बुकिंगसाठी ही सुविधा नाही.

ट्रेन सुटण्याच्या २४ तासआधी करावा लागेल बदल

ज्या प्रवाशांना आपल्या बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करायचा आहे त्यांना ट्रेन सुटण्याच्या २४ तास आधी ऑनलाइन बदल करावा लागेल. मात्र प्रवाशांना आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटनुसार जर एकदा प्रवाशांनी बोर्डिंग स्टेशन बदलले तर ते आपल्या मूळ बोर्डिंग स्टेशनवरून मात्र ट्रेन पकडू शकत नाहीत. जर प्रवाशांनी बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल न करताच दुसऱ्या स्टेशनवरून ट्रेन पकडली तर त्याला दंड भरावा लागेल शिवाय बोर्डिंग स्टेशन आणि जिथून ट्रेन पकडली असेल त्या स्टेशनदरम्यानचे भाडेदेखील भरावे लागेल. ऑनलाइन स्वरुपात बुक केलेल्या तिकिटात तुम्ही बोर्डिंग स्टेशन बदलू शकता.

ही आहे बोर्डिंग स्टेशन बदलण्याची पद्धत-

-सर्वात आधी आयआरसीटीसीच्या https://www.irctc.co.in/nget/train-search या वेबसाइटवर जा.
–लॉग इन करा आणि त्यानंतर ‘Booking Ticket History’वर जा.
– आपल्या ट्रेनला सिलेक्ट करा आणि ‘change boarding point’ वर जा.
– – एक नवीन पेज ओपन होईल. ड्रॉप डाउनमध्ये त्या ट्रेनसाठी नव्या बोर्डिंग स्टेशनला निवडा.
– नवीन स्टेशन निवडल्यानंतर सिस्टम कन्फर्मेशन मागेल. त्यानंतर ‘OK’वर क्लिक करा.
– -बोर्डिंग स्टेशन बदलण्यासंदर्भातील एक एसएमएस तुमच्या मोबाइलवर येईल.

See also  गुटख्याचे मोठे रॅकेट थेट गुजरात पर्यंत.

जर तुमच्याकडे रिझर्व्हेशन नसेल आणि तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकिट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता. तुम्ही सहजपणे तिकिट चेकरकडे जाऊन तिकिट बनवू शकता. हा नियम इंडियन रेल्वेने बनवलेला आहे. यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकिट घेऊन लगेच तिकिट तपासणीकडे संपर्क करावा लागेल. त्यानंतर तिकिट तपासणीस तुमच्या इच्छुक स्थळापर्यतचे तिकिट तुम्हाला बनवून देईल.