जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ज्ञानेश्वर तापकीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल……

0

पुणे :
पुणे जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या योगीराज सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांचा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकी साठी पतसंस्था ”क” वर्ग गटातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.


पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशन वर संचालक असलेले तापकीर यांचा पतसंस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पतसंस्था व बँक प्रतिनिधी यांच्याशी असलेला थेट संपर्क असल्याने याचा त्यांना फायदा होणार आहे. योगीराज पतसंस्थेच्या माध्यमातून तापकीर यांचे सामजिक कार्य उल्लेखनीय आहे. जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या संचालकांचाही तापकीर यांना पाठिंबा आहे. योगीराज पतसंस्थेचे 11000 सभासद तसेच आर्थिक क्षेत्रात असलेली भरीव कामगिरी व जिल्ह्यात असलेला तापकीर यांचा वैयक्तिक परिचय यामुळे तापकीर हे प्रबळ दावेदार असणार आहेत.

सहकार क्षेत्रात काम करत असताना एखाद्या बँकेला जमणार नाही अशा पध्दतीने नियोजन पूर्वक काम योगीराज पतसंस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. योगीराज पतसंस्था बरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे. या सर्व अनुभवांमुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये काम करण्याची संधी मिळावी व त्यातून सहकार वाढीस नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले.

See also  खोदकामात सापडलेली सोन्याची नाणी विकणाऱ्याला अटक.