राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षिततेसाठी निधी देण्यास स्थायी समितीची मंजुरी

0

पुणे :

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या सुरक्षिततेसाठी आरसीसीमध्ये सिमाभिंत बांधणे आणि सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना करण्यासाठी एक कोटी ५३ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती पुणे मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला अधिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्ष काम करण्यासाठी ९३ लाख २८ हजार रुपये खर्च येणार आहे. ११ लाख १९ हजार रुपये जीएसटी आणि टेस्टिंगसाठी ८५ हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तरस खंदक

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तरस खंदक उभारण्यासाठी १ कोटी ९६ लाख रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय प्राणीसंग्रहालयाच्या निकषानुसार हा खंदक उभारण्यात येणार आहे.

प्रयेजा सिटी ते नांदेड सिटी डी. पी. रस्त्याला मंजुरी

प्रयेजा सिटी ते नांदेड सिटी डी. पी. रस्ता करण्यासाठी आवश्यक असणार्या निधीला स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या विकासकामासाठी १ कोटी ७६ लाख ७६ हजार रुपये निधीच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे.

See also  पुण्यात नव्या नियमांमुळे लस असूनही लस न घेता नागरीक घरी