पुण्यात नव्या नियमांमुळे लस असूनही लस न घेता नागरीक घरी

0

पुणे :

दात आहेत पण, चणे नाहीत, अशीच काहीशी परिस्थिती शहरातील नागरिकांची बुधवारी झाली. कोरोनाविरोधी लस आली. पण ती नव्या नियमांमुळे घेता मात्र आली नसल्याची घटना पुण्यात घडली. अनेक ज्येष्ठ नागरिकांना लस न घेता घरी परतावे लागले.

दोन दिवसांचा ब्रेकनंतर पुण्यात बुधवारी लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र ८४ दिवसांच्या नियमामुळे नोंदणी केलेल्या नागरिकांना लस न घेताच परत जाण्याची वेळ आली. त्यामुळे लसीकरण नेमके कोणासाठी असा प्रश्न आता विचारला जात आहे. हा प्रश्न लक्षात घेतला असून नियोजन करू, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.

लस संपल्याने कोव्हीशील्डचे लसीकरण ४ दिवस तर संपूर्ण लसीकरण दोन दिवस बंद होते. मंगळवारी अखेर राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला कोव्हीशिल्डच्या लसी प्राप्त झाल्या. फक्त ७५०० डोस देण्यात आले आहेत. महापालिकेने फक्त दुसऱ्या डोस साठीच केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डोस साठी नोंदणी केलेले लोक तसेच वॉक इन लसीकरण केलं जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.

मात्र नव्या नियमानुसार दोन डोसमध्ये आता ८४ दिवसांचे अंतर असणे बंधनकारक आहे. ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण १ मार्चला सुरू झाले. १ तारखेला पहिला डोस घेतलेल्यांचा दुसऱ्या डोसची तारीख आता २४ मे रोजी येत आहे. त्यामुळे अनेक जणांना लसीकरण केंद्रांवरून माघारी जावे लागले.

See also  बावधन येथील पालिकेच्या हद्दीतील नैसर्गिक झऱ्याची जागा (जलस्रोत ) विकास आराखड्यात आरक्षित करून संरक्षणाची तरतूद करण्याची निसर्ग प्रेमिंची मागणी