बाणेर गावात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामासाठी बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने १५१००० रूपये मदत.

0

बाणेर :

बाणेर गावच्या वैभवात भर घालणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामासाठी बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने १५१००० रूपये स्वराज्य प्रतिष्ठानकडे सुपुर्द करण्यात आले. बाणेर गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असावा ही संकल्पना बाणेर नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे यांनी मांडली होती. ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी प्रल्हाद सायकर यांनी प्रयत्न केले व त्याचे भूमिपूजन उद्घाटन 19 फेब्रुवारीला शिवजयंती दिवशी झाले.

याप्रसंगी डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बाणेर गावात असावा म्हणून ही संकल्पना सायकर यांना सांगितल्यावर त्यांनी तत्काळ यासाठी प्रयत्न करून त्याचे कामही सुरू केले. भूमीपूजन वेळी सांगितल्याप्रमाणे पतसंस्थेच्या वतीने ही आर्थिक मदत केली जात आहे. त्यांनी स्वतः ११११११ रुपये अजून देणार असल्याचे सांगितले.

यावेळी स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष प्रल्हाद सायकर यांनी सांगितले की, बाणेर गावच्या प्रतिष्ठेत महाराजांच्या पुतळा बसल्याने भर पडणार असुन दिलीप मुरकुटे यांनी सुचविल्या प्रमाणे काम सुरू केले आहे ते लवकर पुर्ण होईल. बाणेर नागरी पतसंस्थेने जी मदत केली त्यांचे आभार मानले. कोणताही पक्ष या कामात नसून बाणेर गावची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सगळे एकत्र येण्याचे आव्हान यावेळी त्यांनी केले.

या प्रसंगी राजू शेडगे, लहू सायकर, संजय ताम्हाणे, ॲड. दिलीप शेलार,ॲड. पांडुरंग थोरवे, चेअरमन विजय विधाते, व्हॉईस चेअरमन शशिकांत दर्शने, स्वराज्य प्रतिष्ठान अध्यक्ष प्रल्हाद सायकर, गणेश मुरकुटे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच डॉ. मुरकुटे यांनी मदतीचे आव्हान केल्या नंतर संजय ताम्हाणे यांनी यावेळी  ५१००० रूपये मदत करत असल्याचे सांगितले. तसेच इतर मान्यवरांनी देखिल जमेल तशी आर्थिक मदत करू असे सांगितले.

See also  पीएमपीएल ने शहरभर राबवलेले रक्तदान शिबिर कौतुकास्पद : प्रकाश बालवडकर