शुटिंग वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या राही सरनोबतने पटकावलं सुवर्णपदक !

0

मुंबई :

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेअगोदर आनंदाची बातमी समोर आली आहे. शुटिंग वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या राही सरनोबतने सुवर्णपदक पटकावलं आहे. मुळच्या कोल्हापूरच्या राहीने 5 मीटर पिस्तुलमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत राहीने 39 गुणासह अव्वल स्थान मिळवलं आहे.

राहीचं या वर्ल्ड कपमधलं हे दुसरं पदक आहे. याआधी तिने 10 मीटर एयरपिस्टल प्रकारात महिला टीम इव्हेंटमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. त्यामुळे राहीकडून ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या आशा देशवासियांकडून वाढल्या आहेत.

राहीने 25 मीटर स्पोर्ट्स फायनलमध्ये 39 पॉईंट्स मिळवले पण वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यापासून ती एक पॉईंट मागे राहिली, तर रौप्य पदक जिंकणाऱ्या शूटरपेक्षा राहीला 8 पॉईंट्स जास्त मिळाले. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन पदक मिळवली आहेत. भारताने याआधी एक रौप्य आणि कांस्य पदक जिंकले आहे.
https://twitter.com/OfficialNRAI/status/1409451552880791553?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1409451552880791553%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

दरम्यान, सोमवारी झालेल्या स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल प्रकारात भारताच्या मनू भाकरला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या प्रकारात फ्रान्सच्या माथिल्डे लामोले हिला रौप्य तर रशियाच्या व्हिन्टालियनाला कांस्य पदक मिळालं.

See also  रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द : बीसीसीआय