न्यूझीलंडच्या संघाचा टेस्ट क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकत नवा विक्रम

0

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) आज न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखुन पराभव केला. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाने टेस्ट क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकत नवा विक्रम इंग्लंड मध्ये बनवला.

गेल्या 2 वर्षापासून सुरु असलेल्या आयसीसीच्या टेस्ट विश्वचशकचा आज अखेर शेवट न्यूझीलंडने गोड करत मानाची गदा पटकावली आहे. 2015 आणि 2019 मध्ये न्यूझीलंडला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता मात्र या संघाने संयम दाखवत मानाचा तुरा रोवला आहे.साउदम्टनच्या मैदानात न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्याच दिवशी जोरदार पावसाने जोरदार हजेरी लावत दिवस वाया घालवला. दुसऱ्या दिवशी भारताचे रोहित शर्मा आणि शुभमन गिल फार काळ मैदानात टिकु शकले नाहीत मात्र कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताचा डाव सावरला. पण तिसऱ्या दिवशी दोघेही लवकर बाद झाले. तळाच्या फलंदाजीत अश्विनने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताला 217 पर्यंत मजल मारता आली. जेमिसन ने भारताचे 5 गडी माघारी पाठवले. न्यूझीलंडच्या संघाने कॉन्वेच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात 249 धावा केल्या. भरताकडून मोहम्मद शमी ने 5 गडी बाद केले.

न्यूझीलंड संघाची 32 धावांची आघाडी पार करत भारताचा दुसरा डाव अवघ्या 170 मध्ये गारदला. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाला 139 धावांचे लक्ष मिळाले होते. किविज ने हे सोपे आव्हान 8 गडी राखून पार केले. यात कर्णधार विल्यम्सन (52)आणि रॉस टेलर (47) यांनी महत्वाची खेळी केली.

 

See also  ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय हॉकी महिला संघाने पहिल्यांदाच मारली उपांत्यपूर्व फेरीत धडक