औंध येथे योगा दिनानिमित्त सूर्यनमस्कार शिल्पाचे लोकार्पण सोहळा संपन्न. 

0

औंध :
जागतिक योग दिन व पंडित श्याम प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांच्या स्थानिक विकास निधीतून, वीस लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या औंध आयटीआय च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सूर्यनमस्कार शिल्पाचा लोकार्पण सोहळा पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि आमदार सिद्धार्थ यांच्या हस्ते संपन्न झाला त्याच बरोबर औंध बाणेर व परिसरात योगाचे शिक्षण देणाऱ्या 60 योग शिक्षकांचा सत्कार खासदार खासदार बापट आणि आमदार शिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ श्रीफळ व सन्मानपत्र देऊन करण्यात आला.

नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा देताना खासदार गिरीश बापट म्हणाले की, योगा शिकविणाऱ्या योगा शिक्षकाकडून स्फूर्ती येत असते उत्साह वाढतो. योगा ही भारतीय संस्कृतीची कल्पना हजारो वर्षापासून सुरु असून दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष झाले होते. आता जगातील जवळपास 180 देशात योगाचे कार्यक्रम सुरू आहेत. तसेच प्रभागांमध्ये शब्द दिल्याप्रमाणे आमचे नगरसेवक आमदार आणि खासदार करत आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. एक चांगले कार्यक्रमाचे नियोजन अर्चना मुसळे आणि ॲड. मुसळे यांनी केले आहे. असेच वेगवेगळ्या माध्यमातून ते चांगली काम करतात असे त्यांनी दोघांच्या कार्याचे कौतुक करताना सांगीतले.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले की, योगा शिक्षक योगा शिकवून राष्ट्राची सेवा करत आहे. योगा मुळे परिसरातील नागरिकांमध्ये समरसता निर्माण होत आहे. ते वाढविण्याचे काम योगशिक्षक म्हणून आपण करत आहात, असे त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेविका अर्चना मुसळे यांनी सांगितले की, योगाचे देशातील महत्त्व खूप आहे. योगाची आपली परंपरा फार मोठी आहे. ती जागतिक स्तरा वरती पोहोचली असून आपण आवर्जून योगाचे लाभ घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले. सूर्यनमस्कार शिल्प मुळे आयटीआय रोडच्या सौंदर्यामध्ये भर पडली असून नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी व योगाचे मोफत शिक्षण देणाऱ्या सर्व योग्य शिक्षकांना औंध व प्रभाग 8 मधील अनेक ठिकाणी मोफत जागा उपलब्ध करून देणार असल्याचे माहिती नगरसेविका सौ अर्चना मुसळे यांनी दिली

See also  औंध येथे महाविद्यालयाचे प्राचार्य यांची आत्महत्या !

यावेळी प्रास्ताविक करताना ॲड. मधुकर मुसळे यांनी सांगितले योगाचे फायदे अनेक असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी योगाचा लाभ घ्यावा म्हणून सूर्यनमस्काराचे शिल्प स्फूर्ती घेण्याकरता आपण येथे तयार केले आहेत. ते पाहून नागरिकांचा उत्साह वाढावा त्यांनी योगाचे फायदे आत्मसात करावे या उद्देशाने बसवले आहेत. तसेच स्वतः देखील योगा करत असल्याने चांगले फायदे होत आहेत असेही, त्यांनी यावेळी सांगितले.

हे कार्यक्रमाच्या वेळी खासदार गिरीश बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे, नगरसेविका अर्चना मुसळे, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, सुनील माने, मयूर मुंडे ॲड. मुसळे, योगगुरू भावना जमदानी, सरोज रेवते, शिवचंद्र रेवते, अनिता व अनिल जोशी, माधवी पानसरे, स्मिता गोडबोले, मीना कामदार, मयूर मुंडे, काशिनाथ सूळ, संकेत सांगळे, स्वप्निल सांगळे, विनय शामराज, संतोष वाघ, किरण दोडके, विद्याधर भापकर, दीपक झवेरी, अरविंद खर्चे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन व संचलन ॲड. मधुकर मुसळे यांनी केले तर आभार नगरसेविका अर्चना मुसळे यांनी मानले.