अडचणीच्या प्रसंगी मदत करणारे सगळ्यांशी मैत्री असणारे ज्ञानेश्वरभाऊ तापकीर : भानुप्रताप बर्गे

0

औंध :

जमिनीवर पाय असणारा पक्ष विरहित संघटना विरहित ज्यांची सगळ्यांशी मैत्री आहे असे ज्ञानेश्वर तापकीर अडचणीच्या प्रसंगी लोन म्हणून नाहीतर मदत म्हणून सहकार्य करणारे भाऊ आहे. योगीराज चे विश्वास आणि नाव एवढे मोठे आहे. हे केवळ ज्ञानेश्वर तापकीर यांच्या स्वभावामुळे झाले आहे. मनापासून प्रेम करणारे लोक भाऊंनी कमावली आहे, असे मत माजी सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केले.

योगिराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेवक अमोल बालवडकर, गणेश कळमकर, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे, योगेश कळमकर, गणेश तापकीर, पुनित जोशी, दत्तात्रय गंगणे, मा.महापौर दत्तात्रय गायकवाड, प्रकाश तात्या बालवडकर, नारायण चांदेरे, संजय ताम्हाणे, विजय विधाते, रामदास विधाते, अमर तापकीर, योगेश तापकीर, नाना वाळके, राजेंद्र मुरकुटे, राजेश विधाते, वसंत माळी, अशोक रानवडे, संजय बालवडकर, सचिन चव्हाण, राहुल मुरकुटे, रंजना कोलते आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, तापकीर यांनी राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रात काम केले आहे. ज्या ज्या क्षेत्रात भाऊंनी काम केले त्या त्या क्षेत्रात ते यशस्वी झाले आहेत. असे एकही क्षेत्र नाही जिथे तापकीर यांनी यश मिळवले नाही. महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांना योगीराज च्या व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वाचे कामही ज्ञानेश्वर तापकीर यांनी केले. संस्थेमार्फत विविध क्षेत्रात सामाजिक कार्य केले आहे. आभाळाला हात टेकले असले तरी जमिनीवर पाय ठेवण्याचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे असे गौरव उदगार कुलकर्णी यांनी या प्रसंगी काढले.

माजी महापौर दत्तात्रय गायकवाड शुभेच्छा सांगितले की, सर्व क्षेत्रांमधील ज्ञानेश्वर तापकीर यांचे वलय खूप महत्त्वाचे आहे. सामाजिक क्षेत्र राजकीय क्षेत्र, सहकार क्षेत्र, कृषी क्षेत्र व्यवसाय क्षेत्र या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचे वलय असल्यामुळे ते अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे. योगीराज समूहाचे कार्य खूप मोठे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

See also  औंध मध्ये घनदाट गार्डन वृक्षारोपण व सोसायट्यांच्या सुरक्षारक्षकांचे मोफत लसीकरण यासह सामाजिक उपक्रमाने ॲड. मधुकर मुसळे यांचा वाढदिवस साजरा

सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की, पक्षविरहित काम करणाऱ्या च्या मागे योगीराज सदैव उभी आहे. भविष्यामध्ये योगीराज मध्ये एखादा नगरसेवक व्हावा अशी इच्छा यावेळी त्यांनी व्यक्त केली. नागरिकांनी दिलेले प्रेम व विश्वासाच्या बळावर योगीराज पतसंस्था ची प्रगती होत चाललेली आहे. योगीराज मध्ये मिळालेल्या जिवाभावाच्या सहकाऱ्यानमुळे ही वाटचाल यशस्वी झाली आहे. योगीराज चे मिळालेले सर्व यश संचालक व स्टाफ मुळे आहे.