टोलच्या जागी GPS यंत्रणा बसवण्यात येईल : नितीन गडकरी

0

नवी दिल्ली :

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात सर्व टोलनाके  हटवण्यात येतील. टोलच्या जागी GPS यंत्रणा बसवण्यात येईल, असं नितीन गडकरी म्हणाले. सर्व टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. लोक रस्तेप्रवास जेव्हढा करतील, तेव्हढाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम सुरु असल्याचं गडकरींनी नमूद केलं.

उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी महापालिकेच्या टोलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर गडकरींनी उत्तर दिलं. गडकरींनी मागील सरकारकडे बोट दाखवत, टोलनाक्यांद्वारे मलई खाण्यासाठी असे छोटे छोटे टोल उभारण्यात आल्याचं म्हटलं. शहरांच्या सीमांवर असे टोल असणे चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

जेव्हढा रस्ता वापराल, तेव्हढाच टोल

नितीन गडकरी म्हणाले, “जर आम्ही टोलनाके बंद केले तर रस्ते बनवणाऱ्या कंपन्या आमच्याकडे भरपाई मागतील. मात्र सरकारने पुढील वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्याची योजना केली आहे”

टोल हटवणे म्हणजे टोलनाके हटवणे असा अर्थ आहे. सध्या सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, जिथे तुम्ही हायवेवर प्रवेश करताच, जीपीएसच्या मदतीने तुमचा फोटो काढला जाईल. जिथून तुम्ही हायवे सोडाल, तिथेही फोटो घेतला जाईल. म्हणजे तुम्ही जेव्हढा हायवेचा प्रवास केला किंवा जेव्हढा रस्ता वापरला तेव्हढाच टोल तुम्हाला द्यावा लागेल, असं गडकरी म्हणाले.

टोलनाकामुक्त देश… काय आहे GPS प्रणाली?

रशियन सरकारच्या मदतीने 2 वर्षांत संपूर्ण देश टोलनाका मुक्त होणार ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जीपीएसला अंतिम स्वरूप जीपीएस प्रणालीतून टोल थेट बँक खात्यातून वजा होणार वाहनांच्या हालचालीच्या आधारे टोल वसूल होणार. तंत्रज्ञानामुळे पारदर्शक व्यवहार, कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य.

कसं चालतं जीपीएस (GPS) सिस्टमचं काम?

ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम सुमारे 30 उपग्रहांचे नेटवर्क 20,000 किमी उंचीवर पृथ्वीभोवती फिरते उपग्रह तुम्ही कुठे आणि कोणत्या वाहनासोबत आहात याची अचूक माहिती जीपीएस रिसीव्हरकडून सिग्नल रिसीव्ह करुन प्रक्रियेला सुरुवात ऑटोमॅटिक घड्याळ्यांच्या माध्यमातून सॅटेलाईटमार्फत माहिती जीपीएस प्रणालीच्या आधारे वाहनाच्या हलचालीवरून आकारणार टोल

See also  अमेरिकेसोबत व्हिएन्ना येथे होणाऱ्या कोणत्याही बैठकीत सहभागी होणार नाही : इराण

कार, नौका, विमान, सेल्युलर फोनमध्ये सिस्टम वापरण शक्य.

यापूर्वी नितीन गडकरी काय म्हणाले होते?

ही जीपीएस प्रणाली लागू केल्यानंतर टोलचे पैसे थेट बँक खात्यातून वळते होणार.

सरकार जुन्या वाहनांमध्ये जीपीएस प्रणाली बसवण्याची योजना आखत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या टोल उत्पन्नात 5 वर्षात प्रचंड वाढ होईल.