कबड्डीपटूंच्या कुटुंबियांचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्याकडून सांत्वन.

0

कळंब :

इंदापूर तालुक्यातील कळंब येथील महाराणा कबड्डी संघाचे महादेव आवटे व सोहेल शेख हया दोन गुणी खेळाडूंचा कर्नाटकच्या विजापूर येथे झालेल्या भीषण अपघातातील दुर्घटनेत मृत्यू झाला होता .या दोन्ही खेळाडूंच्या घरी जाऊन पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक व महाराष्ट्र राज्य कार्यकारणी समितीचे सदस्य बाबुराव चांदेरे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

बुधवार रोजी (ता.१७) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास विजापूर (कर्नाटक) येथे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इतर खेळाडूंसह गेले असता त्यांच्या चारचाकी गाडीचा विजापूरजवळ अपघात भीषण झाला होता.अपघातात या दोघांचा मृत्यू झाला तर इतर खेळाडू जखमी झाले होते. या दुर्घटनेमुळे कबड्डीसह क्रीडा क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

नगरसेवक बाबुराव चांदेरे हे क्रीडा, क्षेत्रात क्रीडा प्रेमी विशेषत: कबड्डी प्रेमी म्हणून ओळखले जातात. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या खेळाडूंच्या कुटुंबियांना मानसिक धीर देणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन तातडीने त्यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी वरिष्ठ राष्ट्रीय खेळाडू किरण मगर, सचिन शिंदे, जब्बार शेख इत्यादी उपस्थित होते.

राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यकारीणीशी चर्चा करून संबंधित खेळाडूंच्या कुटुंबियांना सहाय्य करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे कार्यकारिणी समिती सदस्य चांदेरे यांनी यावेळी सांगितले.

फोटो ओळ :- मृत्युमुखी पडलेल्या कबड्डीपटूंच्या कुटुंबियांचे राज्य कार्यकारिणी समिती सदस्य बाबुराव चांदेरे यांनी सांत्वन केले.

See also  हे तर भाजपचे अपयश ....शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे यांची टीका.