बाणेर,औंध मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी 

0

बाणेर / औंध :

बाणेर येथे शिवसेना उपशहर प्रमुख राजेन्द्र धनकुडे यांच्यावतीने शासकीय नियमानुसार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साधेपणाने शिवसैनिकांच्या सोबत शिवजयंती आनंदात उत्साहात साजरी केली. या प्रसंगी शिवलाल धनकुडे, सिधार्थ रनवरे, केशव कारेकर, ऋतिक धनकुडे तसेच शिवसैनिक उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक औंध, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघाचे खरसे साहेब यांच्या हस्ते शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्नेहल बांगर सरचिटणीस युवक कॉंग्रेस, आदिती गायकवाड कडू पाटील सरचिटणीस युवक काँग्रेस, रवी ओझरकर, मनोज दळवी, सुनील जाधवर, बालाजी मांधळे, बंडू मुंडे, संतोष जाधवर, ओम बांगर, महेश बांगर, स्वप्निल बांगर, अमोल बोंदर आदी मान्यवर उपस्थित होते, सदर कार्यक्रमाचे आयोजन मा. नगरसेवक शिवाजी बांगर यांनी केले.

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त औंध गाव व सर्व्ह न १५६ या ठिकाणी याठिकाणी पुष्पहार अर्पण  करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कैलास गायकवाड माजी नगरसेवक पुणे मनपा माजी अध्यक्ष विधी समिती, आदिती गायकवाड कडू पाटील सरचिटणीस पुणे शहर युवक काँग्रेस, स्नेहल बांगर सरचिटणीस पुणे शहर युवक काँग्रेस, रवी मोहोळ, मदन मारुडा, शंकर गावडे, अमित चौगुले, सचिन चौगुले, दत्ता भरम, सचिन लोणारे हे शिवजयंती उत्सवाला उपस्थित होते.

See also  प्रभाग क्र 8 व 9 मध्ये फ्लॉगिंग ड्राईव्ह...