सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सुपर सनी विक ( PABBS west festival) चे आयोजन… 

0

पुणे :

माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम पुणे विभागामध्ये ( PABBS west festival) पाषाण औंध बाणेर बोपोडी सोमेश्वर वाडी या भागातील नागरिकांसाठी, “सुपर सनी विक” – आठवडा आनंदाचा, सकारात्मकतेचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. हे उपक्रम 19 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सहभाग घेण्याची संधी सनी निम्हण यांनी उपलब्ध करून दिली आहे.

घेण्यात येणारे उपक्रम खालील प्रमाणे :

१) राजमुद्रा प्रदर्शन : दिनांक १९ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजवर कधी न पाहिलेल्या मुद्रांवर आधारित भव्य पेंटिंग प्रदर्शन पाहण्याची संधी लाभणार आहे.

२) ड्रॉइंग डिलाइटस : दि. २१ फेब्रुवारी रोजी शालेय गटासाठी भव्य चित्रकला स्पर्धाचे आयोजन.

३) मॉम्स मॅजिक : दि.२३ ते २८ फेब्रुवारी गृहिणी साठी खास पाककृती स्पर्धा.

४) सायन्स सर्कस : दि. २७ ते २८ फेब्रुवारी : शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञानाच्या मॉडेल वर आधारित आधारित प्रदर्शन.

५) जूनियर सायकलोथाॅन : दि. २८ फेब्रुवारी १२ ते १८ वर्ष मुलांची सायकल स्पर्धा.

६) सनीज् आरोग्य अभियान : मोफत आरोग्य तपासणी, मोफत नेत्र तपासणी, मोफत रक्त लघवी तपासणी.

या विविध उपक्रमांनी सनीज् वीक साजरा करण्यात येणार आहे. या मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मुलांनी सहभाग घ्यावा असे आव्हानही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिकांचे सुसरोड येथे बेमुदत ठिय्या आंदोलन....